आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजच साफ होत नव्हते पोट, सर्व प्रकारची औषधेही ठरली निकामी, समोर आले असे काही की सगळेच झाले Shock

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय - चीनमध्ये गेल्यावर्षी एक विचित्र प्रकार समोर आला होता. यात पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीचे ऑपरेशन झाले तेव्हा त्याच्या पोटातून 13 किलोची मल असलेली गाठ काढण्यात आली. ते पाहून डॉक्टरांनाही शॉक बसला होता. तपासात समोर आले की, त्या व्यक्तीला एक गंभीर आजार होता. 5 हजार लोकांमध्ये एखाद्याला हा आजार होतो. 


लोक समजू लागले होते प्रेग्नंट... 
- ही घटना शांघायमध्ये राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाबरोबर घडली होती. त्याला लहानपणापासूनच बद्धकोष्टाचा त्रास होता. त्याचा त्रास एवढा वाढला होता की, औषधाशिवाय त्याचे पोटच साफ होत नव्हते. पण औषधांनीही त्याला फारसा फायदा होत नव्हता. काही वेळानंतर त्याच्या पोटात दुखायला लागायचे. 
- अनेक वर्षांच्या बद्धकोष्टतेमुळे त्याच्या पोटाच्या आतील भागाला सूज आली होती. त्यामुळे त्याचे पोट चांगलेच फुगले होते. फुगलेल्या पोटामुळे लोक त्याला प्रेग्नंट समजू लागले होते. तसेच त्याच्या पुरुष असण्यावरही संशय घेऊ लागले होते. 


पोटातून निघाली 13 किलोची गाठ 
- जेव्हा त्याच्या वेदना प्रचंड वाढल्या तेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. 
- तपासात समोर आले की, त्याच्या पोटात 30 इंचाचे असे काही आहे ज्यामुळे त्याच्या पोटात वेदना होत आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन करून ते बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 
- डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन केले तेव्हा त्याच्या मलाशयात 30 इंच लांब आणि 13 किलोची एक गाठ आढळली. त्यामध्ये मल भरलेले होते. अनेक वर्षांपासूनच्या बद्धकोष्टतेमुळे ही गाठ बनली होती. 
- तीन तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टर म्हणाले की, ही गाठ जीवंत बॉम्बसारखी बनली होती. कधीही ती फुटू शकली असती. तसे झाले असते तर हा व्यक्ती जगू शकला नसता. 


यामुळे होती बद्धकोष्टता 
- डॉक्टरांच्या मते त्याच्या बद्धकोष्टतेमागे पोटाचा एक अत्यंत दुर्मिळ आजार होता. या आजाराहस त्याचा जन्म झाला होता. 
- त्याच्या आतड्यांत काही महत्त्वाच्या कोशिका नव्हत्या. त्यामुळे त्याला शौचास अनेक अडचणी येत होत्या.  डॉक्टरांनी या आजाराचे नाव र्स्चस्प्रुंग असल्याचे सांगितले. 
- हा आजार 5000 मुलांमध्ये एखाद्याला होत असतो. त्याची सुरुवात आईच्या पोटात असतानाच होते. जन्मानंतर दोन महिन्यांतच त्याची लक्षणे दिसू लागतात. 

बातम्या आणखी आहेत...