आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर : शहरात हिरवाई निर्माण व्हावी, म्हणून केंद्र व राज्य सरकारने सन २०१२ पासून हरितक्रांती मोहीम सुरू केली. हरितपट्टा विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाने दिले. हरितपट्टा विकसित करण्यासाठी सहा वर्षात महापालिकेकडे सुमारे १४ कोटी रुपये आले. ते खर्चही झाले. त्याठिकाणी आज जाऊन पाहिले तर तेथे वृक्षही नाही आणि हिरवळही गायब झाली. ती उद्याने अतिक्रमणीत झाली, असून मनोरंजनाची ठिकाणे जुगार व दारूचे अड्डे बनले. महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजनेतून ६.७५ कोटी रुपये खर्च करून १३ बागांचा विकास केला. पण ते आज शोधण्याची वेळ आली आहे. सात कोटी रक्कम पाण्यात वाहून गेल्याची अवस्था आहे. सन २०१५ पासून हरित विकास योजनेतून १८ बागांचा विकास केला. तेथे गवत वाढले. पण उद्यान नसून, जनावरांचे कुरण केंद्र बनले आहेत. कोट्यवधीचा खर्च पण हिरवाई कुठे.... असा आहे खर्च रक्कम कोटीत - सन २०१२ ते १४ - ६.७५ (१३ उद्याने) - -सन २०१५- १६ - १ (६ उद्याने) - सन २०१६- १७ - १.५० (६ उद्याने) - सन २०१७-१८ - २ (६ उद्याने) - स्मार्ट सिटीतून हुतात्मा बागेचा विकास - १.१० मोजक्याच बाग सुस्थितीत पण नागरिकांमुळे कर्णिकनगर, आंबेडकर उद्यान, विकास नगर यासह काही मोजक्या बागा सुस्थितीत आहेत. पण ते महापालिका उद्यान विभागामुळे नाही तर तेथील नागरिकांच्या सहकार्य व जनजागृतीमुळे. शहरातील उद्यानांचा विकास की भकास सात रस्ता येथील कोटणीस उद्यान तर पाच्छा पेठेतील सुभाष, रविवार पेठेतील दुर्लेकर, सिटीबस डेपोजवळील नाना-नानी पार्क, रुपा भवानी मंदिराजवळील रुपा भवानी, आॅफिसर क्लबजवळ संस्मरण, कन्ना चौकातील विणकर, अशोक चौकातील मार्कंडेय, गुरुनानक चौकातील साधू वासवानी, पाथरुट चौकातील मुदगल, बुधवार पेठेतील आंबेडकर, महापालिका आवारातील इंद्रभुवन आणि रवींद्र उद्यान यासाठी ६.७५ कोटी खर्च केले. रस्त्यावरची झाडे जळाली डी मार्ट ते विजापूर रोड, आसरा पूल ते मजरेवाडी रेल्वे गेट आणि जुळे सोलापूर पाण्याची टाकी ते बाॅम्बे पार्क या मार्गावर ३२०० झाडे लावण्यात आली. त्या झाडांचे वर्षासाठी संगोपन मक्तेदार करणे आहे. पण झाडे जळून गेली. पुन्हा लावली नाही. नीलम नगर व एमआयडीसीत काही झाडे लावली. पण तेथे झाड नसल्याची तक्रार नगरसेवक डाॅ. किरण देशमुख, अमर पुदाले, नागेश भोगडे, विनायक विटकर यांनी केली. नूतनीकरणासाठी कोटी खर्च, हुतात्मा उद्यानात पुन्हा खर्च नेताजी सुभाषचंद्र, विणकर उद्यान, जानकी नगर, हुतात्मा उद्यान, अप्पा बुवा सावळकर उद्यानासाठी एक कोटी खर्च केले. स्मार्ट सिटीतून हुतात्मा उद्यानचा विकास करण्यात आला. पण त्यापूर्वी तेथे ८०० झाडे लावण्यात आली होती. मागील वर्षात विकसित केले पण.. सन २०१६-१७ या वर्षात मिळालेल्या दीड कोटी निधीतून जानकी नगर बाग, गीतानगर, सोरेगाव, रोहिणी नगर बाग विकसित केली. पण त्यांची देखभाल मात्र केली जात नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.