Maharashtra Special / पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, 52.90 लाख रूपयांची 14 सोन्याची बिस्कीटे जप्त

 हे सोने तस्करी करून भारतात आणले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

प्रतिनिधी

Jun 17,2019 05:20:00 PM IST

पुणे- येथील आंतराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागातील एअर इंटेलिजंस युनिट(AIU)ने 1633 ग्राम वजनाचे 14 सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहेत, ज्यांची किंमत 52.90 लाख आहे. दुबईवरून 16 जूनला पुण्यालीत आंतराष्ट्रीय विमान तळावर आलेल्या स्पाइस जेट कंपनीचे विमान एसजी-52 मधून हे सोने जप्त करण्यात आले.

ही सोन्याची बिस्कीट विमानाची साफ सफाई करताना वॉश बेसिनच्या मागे एका कागदात गुंडाळलेले आढळली. या सर्व बिस्कीटांवर परदेशी कंपनीचे नाव असल्यामुळे ते परदेशी बनाटीचे असल्याचे सुधांशू खैरे आणि जयकुमार रामचंद्रन या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे सोने तस्करी करून भारतात आणले असल्याचेही समोर आले आहे. पुढील तपास कस्टम अॅक्ट, 1962 च्या अतंर्गत सुरू आहे.


X
COMMENT