आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सउदी अरबमध्ये एका शेखने भारतीयांना बनवले बंधक, जाळ्यात अडकलेल्या एका भारतीयाने लपून घरच्यांना पाठवली ऑडिओ-व्हिडिओ क्लिप...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रोपड(पंजाब)- चांगल्या भविष्याच्या शोधात एका ट्रॅव्हल एजंटच्या मदतीने सऊदी अरबमध्ये गेलेल्या युवकाने त्याच्या कुटूंबीयांना एक ऑडियो क्लिप पाठवली आहे. त्यानी त्यात त्याच्यावर होणाऱ्या आत्याचाराची माहिती दिली. त्यांना तेथे जनावरांप्रमाणे मारले जाते, त्यांच्याकडून खुप काम करून घेतले जाते त्यासोबतच त्यांना एकवेळचे जेवणदेखील मिळत नाहिये. आपल्या सुटकेसाठी त्यांनी  परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे.

 

या युवकांमध्ये रोपड जिल्ह्यातील नूरपुरबेदी गावातील युवक ओंकार सिंग पण आहे जो 2 महीन्यांआधी सुंदरनगर(हिमाचल प्रदेश)च्या एका ट्रॅव्हल एजेंटमार्फत सउदी अरबमध्ये मशीन ऑपरेटरच्या जॉबसाठी गेला होता. पण तेथे एका शेखने त्याला बंदी मजूर बनवले. कुटूंबाला पाठवलेल्या क्लिपमध्ये त्याने त्याच्यावर आणि त्याच्या सोबतींवर होत असलेल्या आत्याचारांची माहिती दिली आहे.

 

परराष्ट्र मंत्रालयात मागितली मदत 

राजिंदरच्या वडीलांनी सांगितले की, त्यांचे कुटूंब खुप गरीब आहे त्यामुळे कामाच्या शोधात एका एजंटच्या मार्फत तो सऊदी अरबला काम करण्यासाठी गेला होता. एजंटने त्याला तेथे 40-50 हजार पग,मोफत राहण्याची-खाण्याची व्यवस्था मिळेल असे सांगितले होते. ओंकारसोबत अजून 13 जणांना तेथे बंदी बनवण्यात आले आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकजे मदत मागितली आहे.

 

मागच्या वर्षीदेखील गावातील 3 लोक सऊदी अरबमध्ये फसले होते ज्यांना भारत सरकारने सोडवून आणले होते.

बातम्या आणखी आहेत...