आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 14 Month Old Boy Servived Even After He Fell Down From Window Of 4th Floor Apartment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देव तारी.. चौथ्या मजल्यावरून पडूनही बालंबाल बचावले 14 महिन्यांचे बाळ, पण झाले गंभीर जखमी, उपचार सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील गोवंडी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे अवघ्या 14 वर्षांचे बाळ चौथ्या मजल्यावरून गॅलरीतून खाली पडले. पण या अपघातात हे बाळ गंभीर जखमी झाले आहे. गॅलरीतून पडल्यानंतर बाळ झाडात अडकल्याने थेट जमिनीवर पडले नाही, त्यामुळे ते बालंबाल बचावले. अथर्व बरकडे असे या बाळाचे नाव आहे. 


अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर असलेल्या घरात अथर्व खेळत होता. बरकडे कुटुंबीय गेल्या वर्षीच या नव्या घरात राहायला आलेले आहे. त्यांनी घराच्या खिडक्यांना सेफ्टी ग्रिल अद्याप लावलेले नाहीत. त्यात घराची खिडकी चुकून उघडी राहिली आणि चिमुरडा अथर्व खेळत त्या खिडकीजवळ आला. त्यावेळी तो गॅलरीतून खाली पडला. पण इमारतीबाहेर असलेल्या झाडांमध्ये अडकत अडकत तो खाली पडला, त्यामुळे तो वाचला. मात्र त्याचे ओठ, पाय आणि यकृताला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो फोर्टीस हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल आहे. 


सुदैवाने अथर्वच्या आजीने त्याला पडताना पाहिल्याने सगळे लगेचच खाली धावले आणि त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.