आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ महिन्यांपासून दुधाऐवजी कॉफी पितेय इंडोनेशियातील अवघ्या १४ महिन्यांची हदिजा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता  - इंडोनेशियातील एका मातापित्यांकडे गेल्या अाठ महिन्यापासून आपल्या मुलीसाठी दूध विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिला कॉफी पाजत होते. १४ महिन्याच्या हदीजा हॉराला तिच्या आईवडिलांनी ती सहा महिन्याची असल्यापासून कॉफी देण्यास सुरुवात केली होती. ती दिवसातून तीन बाटल्या म्हणजे सुमारे दीड लिटर कॉफी पित होती. तिचे पालक तिला इंडोनेशियन कोपी तुरबुक कॉफी देत होते. ही कॉफी व साखर उकळून तयार केली जात असे. हदिजाला जितकी काॅफी दिली जात होती तेवढ्या प्रमाणात मोठी माणसेही पित नाहीत. कारण त्यात कॅफिन असते. पण हदिजावर काही परिणाम झाला नाही. 
 

रात्री झोपण्यापूर्वी काॅफी दिली नाही तर पिण्यासाठी हदिजा करते हट्ट
तिचे आईवडील सैफुद्दिन व अनिता दिवसातून दोन डॉलर कमावतात. त्यामुळे घरखर्च भागवून तिच्यासाठी दूध आणणे त्यांना परवडत नाही. हदिजाची आई अनिताने सांगितले, हदिजाला याचा अपाय होऊ शकतो याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आमच्याकडे पर्याय नाही. तिच्यासाठी दूध विकत आणण्याइतपत पैसे आमच्याकडे नाहीत. यामुळे नाईलाज म्हणून कॉफी पाजतो आहोत. आता तिला कॉफीची इतकी गोडी लागली आहे की, तिला रात्री काॅफी पाजली नाही तर ती झोपत नाही. अनेकदा कॉफी पिण्यासाठी हट्ट करते.  हदिजाची काॅफी पिण्याची बातमी माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर पोलिवाली मंदर हेल्थ एजन्सीचे अधिकारी ितच्या घरी गेले. त्यांनी हदिजाला दूध व काही कुकीज भेट दिल्या. आता अधिकाऱ्यांनी तिला कॉफी  न देण्याचा सल्ला आईवडिलांना दिला आहे. कारण कॅफिन व साखरेमुळे तिची प्रकृती बिघडू शकते. तिचे कुपोषण होईल आणि ५ वर्षाखालील मुलांसाठी कॅफिन धोकादायक घटक असल्याचा इशारा दिला आहे. तिच्या झोपेच्या वेळा बिघडल्या तर हृदयाचा वेग वाढून डिसऑर्डर होतील, असे त्यांचे मत आहे.