आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्नाची नासाडी करणाऱ्यांना दंड आकारून मिळवले 14 हजार रुपये 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारंगल- तेलंगाणातील वारंगल जिल्ह्यातील केदारी फूड कोर्ट हॉटेलमध्ये अन्नाची नासाडी करणाऱ्यांना दंड आकारला जातो. हॉटेलचे संचालक लिंगाणा केदारी यांनी हा नियम लागू केला. हॉटेलमध्ये एक बोर्ड असून यावर उष्टे अन्न सोडल्यास प्रतिप्लेट ५० रुपये दंड आकारले जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

 

केदारी यांनी २ वर्षांत दंडाच्या रकमेतून १४ हजार रुपये जमवले. अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी हा नियम केल्याचे ते सांगतात. दंडातून मिळालेली रक्कम अनाथालयाला देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. हा नियम लागू केल्यानंतर ग्राहक वाढले आहेत. पूर्वी ३०० थालींची विक्री व्हायची आता ८०० थालींचा खप आहे. 

 

दरम्यान, माझ्या या आगळ्यावेगळ्या नियमामुळे हाॅटेलात येणाऱ्या बहुतांश ग्राहकांना अन्न वाया न घालण्याची चांगली सवय लागली. तसेच ते याबाबत जागरूक राहू लागले व त्यांनी इतर जणांनाही सांगणे सुरू केले. त्यामुळे माझा हा उपक्रम सार्थकी लागल्याचे लिंगाणा केदारी यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...