Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | 14-year-old child dies in tippers accident

टिप्परने मामा-भाच्याला उडवले, 14 वर्षीय भाच्याचा जागीच मृत्यू तर मामा जखमी; डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे मृतदेहाचे शवविच्छेदन रखडले

संदीप शिंदे , | Update - Jul 13, 2019, 01:47 PM IST

मागच्या चाकाखाली आल्याने मुलाच्या डोक्याचा झाला चेंदामेंदा

 • 14-year-old child dies in tippers accident

  माढा - 14 वर्षीय विद्यार्थ्याचा टिप्परच्या मागच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवार (12 जुलै) रोजी धानोरे शिवारात सायंकाळी सातच्या सुमारास घडली. श्रेयस गणेश देशमुख असे त्या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अरविंद जगताप हे आपल्या भाच्यासोबत धानोरे गावातील चौकात मोटार सायकलवर उभे होते. दरम्यान खडी (डस्ट) वाहणारे टिपर (क्र. MH 13 ax 4982)चे मागचे चाक श्रेयशच्या तोंडावरुन गेल्याने त्याच्या डोक्याचा व शरीराचा चेंदामेंदा झाला. तर मामा अरविंद जगताप किरकोळ जखमी झाला आहे.


  दरम्यान माढा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शवविच्छेदन करायला बारा तास लोटावे लागले. वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदकुमार घोळवे यांनी शनिवारी सकाळी शवविच्छेदन केले. श्रेयश हा मामा अरविंद यांच्याकडे यावर्षी शिक्षणासाठी धानोरे गावी आला होता. तो गावातील जगदंबा प्रशालेत आठवी इयत्तेत शिकत होता. वडील होम गार्ड तर आई शेतकाम करते. लाडका मुलाचा मृत्यू झाल्याचे समतताच आई वडिलांनी टाहो फोडला. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक किरण घोगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन टिप्पर ताब्यात घेतला आहे. माढा पोलिसांत टिपर चालकाविरोधात फिर्याद देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

  मृतदेह शवविच्छेदनसाठी रखडला
  श्रेयशचा मृतदेह सव्वा नऊ वाजता माढा ग्रामीण रुग्णालयात आणला होता. मात्र ग्रामीण रुग्णालयात कोणीच हजर नसल्याने नातेवाईक श्रेयसचे प्रेत घेऊन ताटकळत ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर बसले होते. माढा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारची ड्युटी असलेल्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रिती भंडारी या दिवसभर उपस्थित नव्हत्या. त्या बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. तर वैद्यकिय अधिकारी डॉ. पी.जी सातव हे ड्युटी करुन गेले होते. डॉ. घोळवे यांनी शनिवारी सकाळी शवविच्छेदन केले.


  याबाबत डॉ. प्रिती भंडारी म्हणाल्या - मी बाहेरगावी आहे. माझी ड्युटी कशी आहे ते सिएस बघतील. आज पीएम होणारच नाही. माझा प्रॉब्लेम मी सीएसला सांगितलाय. यावर आपण उद्या बोलू असे म्हणत त्यांनी फोन ठेवला.

Trending