Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | 14 Year Old Daughter Raped By Father In Nanded Maharashtra

लज्जास्पद: आई विसरभोळी, वेडसर असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच केला अत्याचार

प्रतिनिधी | Update - Mar 16, 2019, 11:33 AM IST

14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 8 वीत शिकते. तिची आई विसरभोळी, वेडसर आहे.

  • 14 Year Old Daughter Raped By Father In  Nanded Maharashtra

    नांदेड- इयत्ता 8 वीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची मानवी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

    जिल्ह्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 8 वीत शिकते. तिची आई विसरभोळी, वेडसर आहे. 1 मार्च रोजी नराधम बापाने बळाचा वापर करून जिवे मारण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने 12 मार्च रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेस सांगितले. त्यांनी मुलीचे आजोबा (आईचे वडील) व आजी (आईची आई) यांना शाळेत बोलावून मुलीसोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. यानंतर पीडित मुलीने आजी-आजोबांसोबत 14 मार्च रोजी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Trending