आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 14 Year Old Girl Forced Into Marriage, Sexually Abused By 3 Of Her Relatives In Gujarat

आधी मामा, मग मावस भाऊ आणि भाऊजी; ज्यांच्याकडे मागितली मदत त्या सर्वांनीच लुटली अब्रू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोरबंदर / इटारसी - मध्यप्रदेशच्या इटारसी येथे रेल्वे पोलिसांनी नुकतीच एक 14 वर्षीय मुलगी बेवारस सापडली होती. गेल्या महिनाभरापासून चाइल्ड लाइनमध्ये राहिलेल्या या मुलीने आपली आपबिती मांडली तेव्हा ऐकणाऱ्यांचे डोळे पाणावले. ही मुलगी मूळची पोरबंदर, गुजरातची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वीच या अल्पवयीन मुलीचा बळजबरी विवाह लावण्यात आला होता. एवढ्या कमी वयात झालेल्या लग्नानंतर पतीने हकलून दिले. यानंतर तिने आपले मानत ज्या-ज्या लोकांची मदत घेतली त्या सर्वांनी तिची अब्रू लुटली. काउन्सेलिंगनंतर झालेल्या या खुलाशावरून पोलिसांनी आता पीडितेच्या मामा, मावस भाऊ आणि भाऊजीवर बलात्कार आणि छेडछाडीचा आरोप दाखल केला आहे. 


आत्याच्या घरी गेली तेव्हा...
> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी रेल्वे पोलिसांना 14 वर्षांची मुलगी होशंगाबाद रेल्वे स्टेशनवर सापडली होती. तिला काउन्सेलिंगसाठी चाइल्ड लाइनच्या हवाली करण्यात आले. या घटनेच्या एका महिन्यानंतर तिने आपली आपबिती मांडली. इतक्या कमी वयात कुटुंबियांनी तिचा विवाह केला होता. पतीने घराबाहेर केल्यानंतर तिने आपले समजून आत्याच्या घरात आश्रय घेतला. याच ठिकाणी तिच्या मामाने तिच्यावर बळाचा वापर करून बलात्कार केला. 
> वयात जवळपास आपल्या बरोबरीचा असलेल्या आत्या आणि मामाच्या मुलाला तिने ही गोष्ट सांगितली. आपल्याला मदत मिळेल अशी तिला अपेक्षा होती. परंतु, त्या मावस भावाने सुद्धा तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. यानंतर तिने आत्याचे घर सोडले आणि आपल्या मोठ्या बहिणीच्या घरात आश्रय घेतला. परंतु, या ठिकाणी सुद्धा तिला काहीच मदत मिळाली नाही. उलट, सख्ख्या भाऊजीने तिच्यासोबत अश्लील चाळे सुरू केले. यानंतर घरात एकटी असल्याचे पाहून बलात्काराचा प्रयत्न केला. या सर्व अत्याचारांना कंटाळून तिने त्या घरातूनही पळ काढला आणि होशंगाबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांची मदत घेतली. 


तिघांविरोधात गुन्हा दाखल...
पोलिसांनी यानंतर पीडितेच्या कुटुंबियांना बोलावून सविस्तर चौकशी केली. तसेच पीडितेची मेडिकल टेस्ट देखील करण्यात आली. त्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर आरोपी मामा पारस चौहाण, आरोपी मावस भाऊ (अल्पवयीन) आणि भाऊजी रवी कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच एफआयआरची कॉपी पोरबंदर पोलिसांना देखील पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पोरबंदर बाल कल्याण समिती करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...