आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाळू होती 14 वर्षीय मुलगी, मांत्रिक म्हणाला- अशा मुलीवर रेप केल्याने होईल धनलाभ; मग ज्याला बांधायची राखी त्याच भावाने सुरू केले अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - गुप्तधनाच्या हव्यासापायी एका 25 वर्षांच्या तरुणाने राखी बांधणाऱ्या मानलेल्या बहिणीला स्मशानात नेऊन तंत्रमंत्र केले, तिला साखळदंडात बांधले, अनेकदा तिच्यावर रेपही केला. 14 वर्षीय या मुलीचा दोष एवढाच होता की, ती पायाळू (पायांकडून जन्म झालेली) होती. एका मांत्रिकाने तरुणाला म्हटले होते की, असे केल्याने तुला धनलाभ होईल. या कामात त्या तरुणाची आई आणि आजीनेही त्याची साथ दिली.

 

मुलगी रडतच म्हणाली- मी त्याला राखी बांधायचे, पण त्याने घात केला...
बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा माया पांडे यांना तसेच पोलिसांत दिलेल्या तक्रारी पीडिता म्हणाली, ''माझे वय 14 वर्षे आहे. मी गांधीनगर वस्तीत राहते. तो माझ्या घराजवळच राहतो, मी त्याला राखी बांधायचे. मानलेला भाऊ असल्याने मी आणि माझ्या कुटुंबीयांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, परंतु 13 नोव्हेंबर रोजी भावाने हा विश्वासघात केला. त्या दिपशी तो माझ्या घरी आला होता, त्याला कळले होते की, मी पायाळू आहे. यावर त्याने मला सोबत येण्यास सांगितले. आधी तो मला एकटीला छतावर घेऊन गेला आणि गुंगीचे औषध देऊन माझ्यावर रेप केला. मी शुद्धीवर येताच म्हणाला- तुझ्यासोबत जे झाले ते तू कुणाला सांगितले तर तुझीच बदनामी होईल. माझे काहीच जाणार नाही. मी मांत्रिब बाबासोबत राहतो. तुला मंत्र मारून गायब करीन. यावर मी खूप भ्यायले. यानंतर तर बलात्काराचे सत्रच सुरू झाले. या कामात त्या नराधमाची आई आणि आजीही त्याची साथ द्यायचे. हा नराधम आणि तो मांत्रिक एका घरात मेणबत्त्या, कापलेले लिंबू, लोखंडी खिळे, शेण आणि सिंदूर घेऊन मला हार घालून निर्वस्त्र करायचे. यानंतर त्यांचे तंत्रमंत्राचे प्रयोग चालायचे. मांत्रिक क्रिया करण्याआधी तो माझ्यावर रेप करायचा.''

 

मुलगी म्हणाली- मला लोखंडी खिळ्यांच्या चाबकाने मारायचे, अगरबत्तीने पूर्ण शरीराला चटके द्यायचे...
''स्मशानात मला चितेवरची भस्म लावून प्रेतआत्म्यांशी मिलन करण्याचे सांगून कित्येक तास मांत्रिक क्रिया करत राहायचे. मला गुंगीची औषधेही खाऊ घातली. या क्रियांदरम्यान हे लोक मला लोखंडी खिळ्यांच्या चाबकाने मारायचे, अगरबत्तीने पूर्ण शरीरावर डागायचे. अनेकदा माझी अवस्था पाहून माझी आई आणि आजी विचारायचे, पण मी भीतीमुळे काहीच बोलू शकत नव्हते. सतत नशा दिल्याने माझी मानसिक स्थिती कमजोर होऊ लागली. शरीरावर मांत्रिक क्रियांच्या यातनांमुळे मी खूप घाबरलेली राहू लागले.''

 

माझी आई जेव्हा नराधमाला विचारायची, तेव्हा तो भूताची भीती घालायचा
''माझी अवस्था पाहून आई त्या नराधमाला जाब विचारायची, पण तो भूत-प्रेताची भीती घालून घाबरवून सोडायचा. मटक्याचा नंबर काढणे, जिन्न पैदा करणे अन् पायाळू असल्याची शक्ती समजून माझ्याकडून सट्ट्याचाही नंबर काढून घेण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयोग करत होते. हे सर्व त्याने धनलाभासाठी केले. बुधवारी माझे सावत्र वडील, आई आणि आजी मला बेशुद्ध आणि बांधलेल्या अवस्थेत बालकल्याण समितीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तेथे पूर्ण घटना सांगितली. यानंतर पोलिसांत तक्रार केली.'' 

 

 

बातम्या आणखी आहेत...