आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्यांवर चिडून एका पडक्या घरात 2 दिवस लपून राहिली 14 वर्षीय मुलगी, तहान-भूक अन् थंडीमुळे निळे पडले ओठ, कपाटात होती चिठ्ठी, लिहिले- शोधण्याचा प्रयत्न केला तर जीव देईन...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- शहरातील साकेत नगर परीसरात घरच्यांच्या त्रासाला कंटाळून एका 14 वर्षांच्या मुलीने घर सोडल्याची घटना घडली होती. कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्रकरणाची चौकशी करत असताना त्यांना मुलीच्या खोलीत एक पत्र आढळून आले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, पत्रात मुलीने आपण घरच्यांच्या जाचाला कंटाळून घर सोडून जात असल्याचे सांगितले. जवळपास दोन दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना एका पडक्या घरात ही मुलगी सापडली असून त्यांनी या प्रकरणी घरच्यांविरुद्ध 164 या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे. मुलीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांकडे सोपवले आहे.

 

घरच्यांच्या जाचाला कंटाळून घर सोडून जात असल्याचे स्पष्ट

मुलीने पत्रात लिहल्यानुसार, 'आपण आजी-आजोबा, काका-काकू हे नेहमी त्रास देत असल्याने आणि आई माहेरी असल्यामुळे रोजच्या जाचाला कंटाळून घर सोडून जात आहोत. जर कोणीही शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण जीव देणार असल्याचे' तिने पत्रात लिहले होते.

घराच्या काही अंतरावरील घरात मुलीची बॅग दिसल्याने मुलगी सापडली.

 

पोलिस उपाधिक्षक दिनेश कौशल यांनी सांगितल्यानुसार, सकाळी 8 वाजता पोलिसांना एका महिलेने साकेत नगर परिसरात घर क्रमांक 104-2बी मध्ये एक शाळेची बॅग पाहिल्याची माहिती दिली. माहितीनुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना एका पडक्या घरात मुलगी गंभीर अवस्थेत सापडली. दोन दिवस तहान-भूक अन् कडाक्याच्या थंडीमुळे मुलीचे प्रकृती बिघडली असून तिचे ओठही निळे पडले आहे. मुलीला रुग्नालयात दाखल करुन पोलिसांनी तिला नातेवाईकांकडे सोपवले आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...