आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 14 Year Old Hanging Himself By Watching Suicide Scene From TV Serial

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

14 वर्षीय मुलाने टीव्हीवरील सीन पाहून उचलले हे धोकादायक पाऊल, छोट्या भावंडांसमोर घडले असे की, सर्वच झाले हैराण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ग्वाल्हेर : ग्वाल्हेर येथील गोला मंदिर परिसरात एक 14 वर्षीय मुलाचा गळफास बसल्यामुळे मृत्यू झाला. टीव्हीवरील मालिकेतील आत्महत्याचे दृश्य पाहून सोमवारी सकाळी एका वर्षीय मुलाने गळफास घेतला. युवकाने आईच्या ओढणीचा फास बनवून गळ्यात घातला आणि फिरू लागला. जवळच त्याची 8 वर्षीय बहीण आणि छोटा भाऊ खेळत होते. खेळता-खेळता ओढणीला पिळ बसला आणि त्याचा गळा आवळल्या गेला. गळफास लागताच युवकाने झटपट केली पण तोपर्यंत उशीर झाला होता. 

 

आईच्या ओढणीसोबत खेळत होता मुलगा आणि.....

मुलाचे वडील शेतकीर असून ते भिंड येथे राहतात. मुलांच्या शिक्षणासाठी पत्नी आणि तीन मुलांना ग्वाल्हेर येथे हलविले होते. पुत्तूलाल भिंड येथे राहत असून कमला ग्वाल्हेर येथे नोकरी करते. आई सोमवारी सकाळी 10 वाजते कामावर गेली होती. दरम्यास सकाळी 11 वाजता मनीष अंजली आणि कपिल एका खोलीत खेळत होते. मनीण टीव्हीवर मालिका पाहत होती. तेवढ्यात अचानक त्याने दुसऱ्या खोलीतून आपल्या आईची ओढणी आणली. कपडे लटकविण्यासाठी खोलीत तार लावलेला होता. मनीण त्याच तारावर ओढणी टाकून फास तयार केला. तो हे काम करत असताना त्याचे बहिण-भाऊ हे सर्व कृत्य पाहत होते. त्यांना याबाबत काहीच समजत नव्हते. मनीषने तो फास आपल्या गळ्यात टाकला आणि गोल गोल फिरू लागला. खेळता-खेळता अचानक त्याला फास बसला आणि तो बेशूद्ध झाला. काहीवेळाने मनीष काहीच हालचाल करत नसल्याचे त्याच्या बहिणीने पाहिले. तिने फास सोडविण्याचा प्रयत्न केला पण तो सुटला नाही. यानंतर ती शेजाऱ्यांना घेऊन आली. शेजारी तत्काळ तेथे आले आणि त्यांनी मनीषला त्या फासातून मोकळे करत अॅम्बुलन्सला पाचारण केले. त्याला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तेथून पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच त्याचे वडील ग्वाल्हेरला आले होते.  

 

वडील म्हणाले - आमचे स्वप्न धूळीत मिळाले

पुत्तूलाल हे कमी शिकलेले आहेत. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मुलांना ग्वाल्हेर येथे शिक्षणासाठी ठेवले होते. मुलाला मोठा अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण हे स्वप्न भंगले असल्याचे ते म्हणाले.


3 महिन्यात 3 दुर्घटना, खेळता-खेळता गेला मुलांचा जीव

 

28 सप्टेंबर : 11 वर्षाची रूची रायकवार गळ्यात ओढणी टाकून खेळत होती. अचानक फाशी बसल्याचे तिचा मृत्यू झाला होता. 

3 डिसेंबर : गोला मंदिरच्या रचना नगर येथे राहणाऱ्या रामखिलाडी यांच्या 12 वर्षीय मुलगा देवेंद्रने खेळता-खेळता आईच्या ओढणीने गळफास घेतला होता.