आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 14 Year Old Kidnapped And Reped, Police Did Not Register Fir Despite Written Complaint In Hoshiarpur

आईसमोरच मुलीला नेले उचलून, तोंडावर कापड बांधून रात्रभर बलात्कार; बाप म्हणाला- एकुलती एक लेक फुलासारखी जपली, पोलिसांत चकरा मारतोय- ते काहीच करत नाहीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर (पंजाब) - गत शनिवारी शहरात एका 5व्या इयत्तेत शिकणाऱ्या (14) मुलीला तिच्या अपंग आईसमोरच किडनॅप करण्यात आले. आई मदतीसाठी ओरडत होती, पण कुणीच पुढे आले नाही. आरोपीने मुलीला नेऊन रात्रभर तिच्यावर बलात्कार केला. रविवारी पीडित मुलीला सोडून तो फरार झाला. आई-वडिलांनी पोलिसांना आरोपीचे नाव (सनी) व इतर माहिती दिली. लेखी तक्रारही दाखल केली, परंतु संवेदनाहीन पोलिसांनी तर्क दिला की, या नावाचे भरपूर लोक शहरात राहतात, कुणाला अटक करू?

 

पोलिसांच्या बेपर्वाईमुळे वेदना दुप्पट वाढल्या

पोलिस एफआयआर दाखल करण्याचेसुद्धा कष्ट घेत नाहीत. पीडित मुलगी आपल्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य आहे. अपहरण-रेपच्या या घटनेत कुटुंबीयांची अवस्था अतिशय विदारक झाली आहे, त्यावर कडी म्हणजे पोलिसांच्या बेजबाबदार वागण्याने त्यांच्या वेदना दुप्पट केल्या आहेत. माणुसकीलाही लाज आणणारी एक रिपोर्ट...  


आईच्या तोंडून... मुलीच्या अपरहणाची कहाणी
पीडित मुलीच्या अपंग आईने सांगितले की, त्यांची मुलगी इयत्ता पाचवीमध्ये शिकते. शनिवारी रात्री 8.30 वाजता मुलगी घराबाहेर बांधलेल्या टॉयलेटमध्ये जात होती. तेवढ्यात एक जण तेथे आला आणि तिच्या तोंडावर कापड बांधून तिला फरपटत नेऊ लागला. मी मोठ्याने ओरडले पण एका पायाने लाचार असल्याने आरोपीच्या मागे पळू शकले नाही. आरोपीने मुलीला बाइकवर बसवून पळ काढला. मी आरडाओरड केल्यानंतर पती आणि दीर बाहेर आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गल्लीतील कोणतीही व्यक्ती वेळेवर धावून आली नाही. पती आणि दिराने लोकांसोबत मिळून आसपास शोध घेतला, परंतु काहीच शोध लागू शकला नाही. आई म्हणाली की, आरोपी रविवारी सकाळी त्यांच्या मुलीला गल्लीच्या बाहेर फेकून फरार झाला. मुलीने त्या दिवसापासून अन्नाच एक कणही खाल्लेला नाही. ती खूप भ्यायलेली आहे. आई म्हणाली- मी अपंग नसते, तर आरोपीला पकडून ठेवले असते. माझ्या मुलीची अब्रूही वाचवली असती.


तोंडावर कपडा बांधून रात्रभर आरोपीने केला बलात्कार...
घरी परतलेल्या पीडित मुलीने सांगितले की, आरोपी जेव्हा तिला किडनॅप करून एका कोठीवर घेऊन गेला, तेव्हा तिच्या तोंडावर कापड बांधलेले होते. तो तिला सातत्याने जिवे मारण्याची धमकी देत होता. म्हणाला - तू जर ओरडलीस, तर तुझ्या घरच्यांना जिवे मारून टाकीन. आरोपीच्या धमक्यांमुळे ती भ्यायली होती. तो जसे म्हणत होता, ती ऐकत गेली. पीडिता म्हणाली- आरोपीने रात्रभर तिच्यासोबत घाण काम केले. त्याने स्वत:चे नाव सनी सांगितले होते. तो डगाणा गावात टॅक्सी चालवत होता. तो सारखा म्हणत होता की, मी तुला खूप खुश ठेवीन. मी विरोध केला पण माझे काही चालले नाही. रविवारी सकाळी 6 वाजता तो मला गल्लीच्या बाहेर सोडून पळून गेला.


बाप म्हणतो- पोलिसांत खूप चकरा मारल्या, लेखी तक्रारही दिली, पण पुढे काहीच होत नाही...
रिक्षा चालवून कुटुंबाचे पालनपोषण करणारे पीडितेचे वडील म्हणाले की, माझे कुटुंब यूपीचे आहे. आम्ही अनेक वर्षांपासून होशियारपूरमध्येच राहतोय. मला फक्त एकच मुलगी आहे. एकुलत्या एक लेकीला मी फुलासारखे सांभाळले आहे. पोलिसांना मी आरोपीच्या नावासोबतच त्याची इतर माहितीही पुरवली, परंतु 3 दिवसांनंतरही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. मी सारखा पोलिसांत चकरा मारतोय. 11 तारखेला मी लेखी तक्रारही दिली होती, अटक तर दूर आतापर्यंत एफआयआरसुद्धा दाखल नाही. मी करू तरी काय...!


आरोपीला फक्त नावावरूनच अटक करता येत नाही : एएसआय 
पीडित परिवाराने आरोपीचे फक्त नावच सांगितले आहे. या नावोच खूप लोक शहरात राहतात. कुणा-कुणाला अटक करावी. पोलिसांचा तपास सुरू आहे. कारवाई होईल.

- नानक सिंह, एएसआय, मॉडल टाउन पोलिस स्टेशन.

 

बातम्या आणखी आहेत...