आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

''मी तर भावजीसोबतच राहीन, तुला सहन होत नसेन तर जाऊन मर...'' जिव्हारी लागले पत्नीचे हे बोलणे, सुसाइड नोट लिहून पतीने दिला जीव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - लग्नाच्या 14 वर्षांनंतर पतीचे घर सोडून पत्नी आपल्या बहिणीच्या पतीसोबत राहण्यासाठी गेली. दोन्ही बाजूंत ठरले की, पती-पत्नीत जमत नसेल तर घटस्फोट घ्यावा. याच्या काही दिवसांनी पतीने आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये मृत हरीश कोटकने लिहिले- त्याची पत्नी तिच्या मावस बहिणीचा पती कमलसेाबत राहू लागली आहे. कमल त्याला ब्लॅकमेल करत आहे. कमल म्हणतो की, माझ्या या अटी मान्य कर, नाहीतर तुझ्या बायकोला कधीच घरी जाऊ देणार नाही. मृत पतीचा भाऊ धर्मेंद्रने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


पालनपूरच्या उन्नती पार्कमधील रहिवासी धर्मेंद्र म्हणाले की, 9 मे 2004 रोजी त्याचा भाऊ हरीशचे लग्न दिव्यासोबत झाले होते. लग्नाच्या 4 ते 5 वर्षांनी तो सुरतेत येऊन छोटी-मोठी कामे करू लागला. दिव्याचे माहेरही सुरतेतच आहे. 6 महिन्यांपूर्वी हरीश आपला मित्र राजेशसोबत काम करत होता. त्याची पत्नी दिव्या ब्यूटी पार्लरमध्ये 6-7 महिन्यांपासून नोकरी करत होती. यावरून दोघांत भांडणे व्हायची. धर्मेंद्र म्हणाले, पती-पत्नीमधील भांडणाची माहिती हरीश त्यांना सांगायचा. एका दिवशी त्याने सांगितले की, दिव्याचे संबंध मावस बहिणीचा पती कमलसेाबत होते. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणे झाली. ऑक्टोबर 2018 मध्ये दिव्या हरीशला सोडून काहीही न सांगता निघून गेली. दोन दिवसांनी हरीश तिला घेऊन आला, पण दिव्या म्हणायची की, तिला कमलसोबतच राहायचे आहे. जर तुला हे सर्व सहन होत नसेल तर कुठे तरी जाऊन जीव दे. पत्नीचे हे बोलणे हरीशच्या जिव्हारी लागले आणि त्याने जीव देण्याचा निश्चय केला.

 

पतीने मृत्यूपूर्वी सुसाइड नोटमध्ये लिहिले- माझा संसार बरबाद झाला आहे...
23 डिसेंबर रोजी दिव्या पुन्हा निघून गेली. नंतर दोन्ही बाजूंमध्ये ठरले की, घटस्फोट घ्यावा. 28 डिसेंबरला हरीशने गळफास लावून आत्महत्या केली. हरीशने सुसाइड नोटमध्ये लिहिले होते- माझा संसार बरबाद झाला आहे. यामागे कमलचाच हात आहे. कमलने माझ्या पत्नीला आपल्या जाळ्यात ओढून मला ब्लॅकमेल करणे सुरू केले. 

 

बातम्या आणखी आहेत...