आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांची मुलगी बाथरूममध्ये मोबाइल फोनचा करत होती वापर, तेवढ्यात चुकून हातातून निसटला फोन आणि जागीच झाला मुलीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेबोक्सरी : रूसमधील एक मुलगी बाथरूममध्ये फोन वापरात असल्यामुळे तिचा मृत्यू झाला. चेबोक्सरीमध्ये राहणारी 14 वर्षांची यूलिया व्योत्सकाया बाथरूममध्ये फोन चार्जिंगवर लावून युज करत होती. तेवढ्यात तिचा फोन पाण्यात पडला. तिने मोबाइल बाहेर काढून पुन्हा वापरायला सुरुवात केली तेव्हाच फोनमध्ये शॉर्ट सर्किट झाला. बऱ्याचवेळाने जेव्हा ती बाहेर आली नाही तेव्हा पेरेंट्स परेशान झाले. दरवाजा तोडून आत पहिले तर युलिया जमिनीवर पडलेली होती. पैरेंट्सने लगेच एंबुलेंसला बोलावले. पण तेव्हाच तिचा मृत्यू झाला. 

यापूर्वीही झाली आहे अशीच एक घटना...  
- डिसेंबरमध्ये 15 वर्षांची मार्शल आर्ट चॅम्पियन इरिना रिबनिकोवाचा मृत्यूही बाथरूममध्येच मोबाइलचा वापर करतांना झाला होता.  
- मॉस्कोमध्ये 12 वर्षांची केंसियाचा मृत्यूही चार्जिंग करतांना गाणी ऐकत असल्यामुळेच झाला होता. 

इलेक्ट्रोनिक इंजिनियरने लोकांना सावध करत सांगितले, 'फोनचा चार्जिंग करतांना वापर करू नये. बाथरूममध्ये फोनचा वापर करुनये कारण पाणी विजेचे गुड कंडक्टर असते. ज्यामुळे जोरात झटका लागू शकतो. असे करणे म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखे आहे.