आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत सरकारी रुग्णालयात रुग्ण मुलीचा विनयभंग; सफाई कामगाराला पोलिसांनी केले अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाणे येथील सरकारी रुग्णालयात दाखल असलेल्या एका 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या सफाई कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश कोळी असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे.

 

19 डिसेंबर रोजी मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, काही दिवस तिला रुग्णालयातच थांबवण्याचा सल्ला देण्यात आला होता. शनिवारी सकाळी तिच्याजवळ कोणीही नसल्याची संधी साधून कोळी याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. पालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर कोळी याला अटक करण्यात आली.

 

बातम्या आणखी आहेत...