आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांचा मुलगा स्वत:च्या अपहरणाची गोष्ट रचून पोलिसांना देत होता चकवा, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर समोर आले सत्य...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीकर- राजस्थानातील एका शालेय विद्यार्थ्याने शाळेतील गृहपाठ पुर्ण न केल्याने स्वत:चे अपहरण झाले असून कुटूंबियांना खोटी माहीती सांगिल्याची घटना घडली आहे. क्लासला जात असताना अचानक त्याने गृहपाठ पुर्ण न केल्याच्या भीतीने रसत्यात आपली सायकल आणि बॅग टाकून कुटूंबियांना फोनवरून स्वत:चे अपहरण झाल्याचे सांगितले. कुटूंबियांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरूवात केली तेव्हा तो मुलगा दोन दिवस नवनविन माहीती सांगून पोलिसांना चकवा देत राहीला.

 

पोलिसांनी दाखवलेले सीसीटीव्ही फुटेज पाहून मुलाने मान्य केली स्वत:ची चुक

> उद्योगनगर स्टेशन अधिकारी राममनोहर यांनी सांगितले की, घटना कळाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवस शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. कॅमेरांमध्ये तो मुलगा स्वत: सायकलवरून जाताना दिसत होता. पोलिसांनी बुधवारी त्या मुलासोबत त्याच्या कुटूंबियांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली. जेव्हा मुलाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले तेव्हा त्याने आपली चुक मान्य करत सांगितले की, शाळेतील आणि क्लासचा गृहपाठ पुर्ण न केल्यामुळे आपले आपहरण झाल्याची खोटी बातमी सांगितली. मुलाचे अपहरणाची बातमी ऐकून त्याच्या कुटूंबियांनी 12 नोव्हेंबरला पोलिस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीत त्यानी सांगितले की, त्यादिवशी संध्याकाळी त्यांचा मुलगा सव्वाचारच्या दरम्यान क्लासला निघाला होता. त्यावेळी क्लासला जात असताना लाल रंगाच्या तवेरामध्ये त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा हा  सर्व प्रकार खोटा असल्याचे समोर आले.

 

पोलिसांना दोन दिवस चकवा देत लपून राहिला मुलगा

> तो मुलगा दरवेळी नवनवीन माहीती सांगून दोन दिवस पोलिसांना चकवा देत राहीला. पोलिसांनी संपूर्ण शहराचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना तीन पुरावे सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांना पुरावे दाखवल्यानंतर मुलाने सगळी घटना सांगितली.

 

बातम्या आणखी आहेत...