आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

140 साधकांची आळंदी ते पंढरपूर केवळ लिंबूपाणी, मधावर घेऊन रोज 40 किमी उपवास जनजागृती यात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळापूर- येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान व अाध्यात्मिक संघटनेच्या  महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर उपवास जनजागृती पदयात्रा काढण्यात आली.   महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान,  गुजरातमधील १४०  साधक पदयात्रेत  सहभागी आहेत. दररोज केवळ लिंबूपाणी आणि मध प्राशन करून हे साधक ४० किलोमीटर  प्रवास करत आहेत. गुरुवारी रात्री ही दिंडी वेळापूर (ता. माळशिरस) येथे पोहोचली.  श्री आनंदमूर्ती सेवा मंडळ,  मानस योग साधना अकलूज शाखेने दिंडीचे स्वागत केले.

 

दहा देशांमध्ये कार्यरत

विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून  काम करणारी ही संघटना १० वर्षांपासून जगभरातील १० देशांत  काम करत असल्याचे संघटनेचे प्रमुख डॉ. गोपाल शास्त्री यांनी सांगितले. अन्न हे पूर्णब्रह्म आहे,  परंतु अन्नाशिवायही जगता येते,  हे विज्ञानाने सिध्द केले आहे, असे शास्त्री म्हणाले. 

 

स्वत:वर प्रयोग :

औरंगाबाद येथील प्रमुख एस.  एन. पाटील म्हणाले, या संघटनेच्या माध्यमातून  २००१ पासून स्वत: वर अनेक प्रयोग केले. त्याचा फायदा झाला. नगर ते उरळी कांचन असा १६० किलोमीटर प्रावस केल्याचे ते म्हणाले.

 

चार ग्लास लिंबूपाणी, मध :

भोजन शरीराचे निर्मिती तत्त्व आहे, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली. साधक रोज सकाळी आणि सायंकाळी दोन ग्लास लिंबूपाणी आणि मध घेतात.

 

आनंददायी जीवनपद्धती  

स्नेहा जंगले, औरंगाबाद ( वय १८) , पर्वतभाई करघटीया, गुजरात (७५), ज्योती माहूरकर, पुणे (५०), विजया कोळपकर (६५), महेश मोदी, मध्यप्रदेश (६४) , विजयलक्ष्मी उदमपूर, राजस्थान (वय ६२) , स्वामी दीनानाथ महाराज, हरिद्वार (७०), पुरुषोत्तम लढ्ढा, गुजरात (६६) या बायपास शस्त्रक्रिया झालेल्यांनी अनुभव कथन केले. ही जीवनपध्दती उत्साही अाणि खरी आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...