आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 140 Million Years Old Massive Bone Found In France, It Is Of A Giant Sauropod Dinosaurs

जंगलात सापडले सगळ्यात मोठ्या शाकाहारी डायनासोर सॉरोपॉडचे हाड, केवळ मांडीची लांबी 6.6 फूट तर वजन तब्बल 500 किलो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- फ्रांसच्या शॅरेंट परिसरातील आंजेक जंगलात खोदकामादरम्यान शाकाहारी डायनासोर सॉरोपॉडच्या मांडीचे हाड सापडले आहे. 6.6 फूट लांब आणि 500 किलोग्रामचे हे हाड अंदाजे 1400 लाख वर्षे जुने आहेत.

 

शास्त्रज्ञांनी सांगितले की, शॅरेंट हा परिसर अवशेषांनी भरलेला आहे. याच जागेवर 2010 मध्ये सॉरोपॉडचे एक 6 फुटांचे मांडीचे एक हाड मिळाले होते. जुरासिक काळाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये सॉरोपॉड आढळत होते.


फ्रांसचा शॅरेंट अवशेष आणि ब्रांड्रीसाठी प्रसिद्ध
सॉरोपॉड डायनासोर चार पायांच्या जातीमधील आहेत. त्यांची मान आणि शेपटी मोठी असते. तसेच तोंड लहान आणि शरीर मोठे असते. हा डायनासोर सगळ्यात मोठा शाकाहारी प्राणी होता. फ्रांसचे शॅरेंट क्षेत्र दोन वस्तुंसाठी लोकप्रिय आहे. पहिले कॉगने परिसरातील प्रसिद्ध ब्रांड्री आणि दुसरे म्हणजे अवशेष.

बातम्या आणखी आहेत...