आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील पाच वर्षांत राज्यात 14 हजार 591 शेतकरी आत्महत्या - मंत्री विजय वडेट्टीवार यांची विधानपरिषदेत माहिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑक्टोबर 2014 ते ऑगस्ट 2019 दरम्यान महाराष्ट्रात तब्बल 14 हजार 591 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी ही माहिती दिली. तसेच नागपूर आणि अमरावती महसूल विभागांतर्गत येणाऱ्या 11 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 1 हजार 286 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवारांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.5 हजार 430 प्रकरणे शासकीय मदतीसाठी अपात्र, तर 214 प्रकरणे प्रलंबित  


ऑक्टोबर 2014 ते ऑगस्ट 2019 पर्यंत तब्बल 14 हजार 591 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी 5 हजार 430 प्रकरणे शासकीय मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. तर 214 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत असे वडेट्टीवार यांनी लेखी उत्तरात सांगितले. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, "नागपूर आणि अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये 2019 मध्ये 1 हजार 286 शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे."35 लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ

ठाकरे सरकारने डिसेंबरमध्ये  शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती.  शनिवारी या योजनेतील लाभार्थ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.