आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी होत सावळं तर कुणी सडपातळ, एक तर नाकाची सर्जरी करुन अडचणीत अडकली, दीपिका-प्रियांकापासून रणवीर-अर्जुनपर्यंत असा बदलला बॉलिवूडच्या 15 स्टार्सचा Look

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. प्रियांका चोप्रा-निक जोनास आणि दीपिका पादुकोण-रणवीर सिंह आता ऑफिशियली पती-पत्नी बनले आहेत. लग्नामध्ये दोन्हीही अभिनेत्री खुप स्टायलिश दिसल्या. वेळेबरोबर प्रियांका आणि दीपिकामध्ये खुप बदल झाले आहेत. यांची प्रसिध्दी वाढली आहे, यासोबतच अभिनेत्रींच्या लूकमध्ये खुप बदल आले आहेत. आजच्या या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला 15 बॉलिवूड सेलेब्सचे फोटोज दाखवणार आहोत. या सेलेब्सचा लूक सुरुवातीपेक्षा आता खुप बदलला आहे. 


1. प्रियांका चोप्रा 
प्रियांकाने मॉडलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर पीसीने 'द हीरो'(2003) मधून बी-टाउनमध्ये डेब्यू केला होता. प्रियांकाने लूक बदलण्यासाठी नाकाची सर्जरी केली होती, यामुळे अडचणीत अडकली होती. भारती एस. प्रधान यांच्या 'प्रियांका चोप्रा: द डार्क हॉर्स' पुस्तकानुसार मिस वर्ल्ड बनल्यानंतर प्रियांकाने अनिल शर्मासोबत 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ स्पाई' साइन केला होता. पण अनिल यांनी प्रियांकाची नाकाची सर्जरी पाहिली तेव्हा ते भडकले होते. त्यांनी प्रियांकाला चित्रपटात न घेण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा प्रियांकाची आई म्हणाली की, प्रियांकाचा हातातील चित्रपट गेला आहे आणि आता तिला बरेलीमध्ये परत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही तेव्हा अनिल शर्माने प्रियांकाला सेकंड लीड अॅक्ट्रेस म्हणून घेतले होते. 

 

2. दीपिका पादुकोण 
दीपिकाने चित्रपटांमध्ये एंट्री करण्यापुर्वी मॉडलिंगच्या दुनियेत आपली ओळख बनवली. कॉलेजच्या काळात तिने मॉडलिंगला सुरुवात केली होती. लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्का सारख्या ब्रांड्सची ती अम्बेसडर राहिली आहे. दीपिकाला Maybelline  या कॉस्मॅटिक कंपनीने इंटरनॅशनल स्पोक्स पर्सन बनवले होते. 2006  हे वर्ष दीपिका पादुकोणसाठी लकी ठरले आणि ती किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली. हिमेश रेशमियाच्या  'नाम है तेरा' या म्यूझिक व्हिडिओमध्ये ती दिसली. 2006 मध्ये तिने कन्नड फिल्म 'एश्वर्या'मधून डेब्यू केला. तर 2007 मध्ये तिने शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच काही बॉलिवूड कलाकारांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...