अतिवृष्टी / तमिळनाडुत जोरदार पावसामुळे भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू, चेन्नईसहित अनेक शहरात शाळा कॉलेज बंद

  • हवामान विभागानूसार हिंद महासागरातील कोमोरिनजवळील चक्रीवादळामुळे पाऊस

दिव्य मराठी वेब टीम

Dec 02,2019 11:35:43 AM IST

चेन्नई- तमिळनाडुच्या मेट्टुपलायममध्ये मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच वचाब कार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल झाली. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तमिळनाडू आणि पुदुचेरीच्या काही भागात पुढील काही दिवस पाऊसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेन्नईसहित अनेक शहरात पावसामुळे शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.


हवामना विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिंद महासागरातील कोमोरिनजवळ एक चक्रीवादळ तयार झाले आहे, त्यामुळेच किनारपट्टी असलेल्लाय शहरांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पाऊसामुळे तमिळनाडूमध्ये अनेक लोकांचा जीव गेला आहे. रविवारी उत्तर-पूर्व मानसुनमुळे तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये आणि शेजारील राज्य पुडुचेरीमध्ये 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामना खात्याने पुढील 48 तास पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

X
COMMENT