आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 लाखांची लाच, बीडचे वरिष्ठ सहायक, आवेदकाला सक्तमजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : शिवकालीन पाणी साठवण योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने दाखल केलेला प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी येथील भू-वैधानिक कार्यालयातील वरिष्ठ सहायक प्रकाश पुरी व आवेदक बाबासाहेब मनेरी या दोघांना १५ हजारांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतल्याची घटना २०१० मध्ये घडली होती.


याप्रकरणी न्यायालयाने पंचांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपी प्रकाश पुरी यास १ वर्षे सक्त मजुरी, पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली, तर त्याला सहाय्य करणाऱ्या बाबासाहेब मनेरी यास सहा महिने शिक्षा आणि एक हजारांच्या दंडाची शिक्षा प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी सुनावली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी वकील मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले. योजनेचा प्रस्ताव रोहतवाडी ग्रा. पं. तर्फे कार्यालयाकडे सादर केला होता. हे काम अंदाजे १२ लाखांचे होते. यात ४० टक्के रक्कम ही संबंधित कार्यालयाकडून मिळणार असल्याने ग्रा. पं. च्या वतीने या तलावाचे काम पूर्ण करून निधीसाठीचा प्रस्ताव उपसरपंच पांडुरंग नागरगोजेंनी सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरीसाठी पुरींंनी १५ हजारांची मागणी केली होती.