आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूर- महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल तापी नदीच्या बॅकवॉटर मध्ये बोट उलटून 15 जण बुडाले त्यात स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणारे लोकांनी 6 जणांचे प्राण वाचवले. 1 बालिकेसह 7 जणांचा घटनास्थळी बूडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी चार वाजेच्या सुमारास तापी नदीच्या उकाई धरणातील बॅक वाॅटर जवळील भींतखुद गावाजवळील घटना घडली. बचावकार्य सुरू झाले असून अंधार पडल्याने बचाव कार्याला अडचणी येत आहे. पोलfस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी, सुरत येथील अग्नीशमन दलाची टिम घटनास्थळी रवाना झाली आहे. माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
होळीची सुट्टी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार सहलीसाठी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी गेले. भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आल्याने बोट अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात वाचवा-वाचवा अश्या आरडाओरड आल्याने गावाजवळील ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारल्या सहा जणांना वाचवले. सुंदरपूर नवापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे.सुंदरपुर गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जाणचा समोवश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.