आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीत झाला मुकेश अंबानींच्या मुलीचा साखरपुडा, 15 PHOTOS मध्ये बघा फंक्शनची खास झलक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मुकेश अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानी हिचा 21 सप्टेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे साखरपुडा झाला. येत्या डिसेंबर महिन्यात ती बिझनेसमन आनंद पीरामलसोबत विवाहबद्ध होणार आहे. इटलीत तीन दिवस ईशा आणि आनंद यांच्या साखरपुड्याचे सेलिब्रेशन झाले. हे तीन दिवस खास बनवण्यासाठी पाहुण्यांना खास ड्रेस कोड फॉलो करावा लागला. साखरपुड्याची विधी पहिल्या दिवशी झाली. या शाही सोहळ्याचे खास फोटोज सोशल मीडियावर व्हायारल झाले आहे. एका फोटोत नीता अंबानी मुलीच्या साखरपुड्याची घोषणा करताना तर एका फोटोत ईशा तिच्या वडिलांसोबत एन्ट्री घेताना दिसतेय. काही फोटोज नीता अंबानी यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहेत.

 

ईशा-आनंदसाठी होते सरप्राइज...
ईशा आणि आनंद यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून साखरपुड्याच्या दिवशी खास सरप्राइज देण्यात आले.  रिंग सेरेमनी झाल्यानंतर या कपलवर गुलाबांच्या फुलांचा वर्षावर करण्यात आला. हे बघून ईशा अतिशय आनंदी दिसली.  
- साखरपुड्याच्या दिवशी ईसा अंबानी गोल्डन वन पीस ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसली. तर आनंदने ओलिव ग्रीन व्हेलवेट शेरवानी परिधान केली होती.

 

जॉन लेजेंडचा लाइव्ह परफॉर्मन्स...
तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. पहिल्या दिवशी लंचवेळी कॅज्युअल ड्रेसअप हा ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. तर संध्याकाळी सगळ्यांना ब्लॅक कोट, पँटसोबत व्हाइट शर्ट आणि ब्लॅक टाय हा ड्रेस कोड फॉलो करावा लागला. दुस-या दिवशी इटॅलियन फिएस्टामध्ये पाहुण्यांनी Como Chic लूक फॉलो केला. डिनरसाठी कॉकटेल अटायर हा ड्रेस कोड होता. शेवटच्या दिवशी फेअरवेल लंचमध्ये गेस्ट स्मार्ट कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसले.

- अमेरिकन गायक जॉन लेजेंडच्या लाइव्ह परफॉर्मन्सने ईशा आणि आनंद यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चारचाँद लावले.

 

प्रायव्हेट जेटने पोहोचले पाहुणे... 
फंक्शनमध्ये अनिल कपूर आणि जान्हवी कपूर यांच्याव्यतिरिक्त सोनम कपूर आणि तिचे पती आनंद आहुजा, प्रियांका चोप्रा आणि तिचा भावी पती निक जोनास, आई मधू चोप्रा, भाऊ सिद्धार्थ चोप्रा सहभागी झाले होते. याशिवाय जुही चावला, मनीष मल्होत्रा, आदर पूनावाला हे सेलब्सही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मनीष मल्होत्रा त्यांची मैत्रीण आदर पूनावालासोबत प्रायव्हेट जेटने लेक कोमो येथे पोहोचले होते.

 

नोव्हेंबरमध्ये होऊ शकते प्री-वेडिंग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंद पीरामल आणि ईशा अंबानी यांच्या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन्स नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील. मग उद्यपूरमध्ये येथे लग्न होईल.

 

कोण आहेत आनंद पीरामल...
33 वर्षीय आनंद हे पीरामल ग्रुपचे संस्थापक अजय पीरामल यांचे ज्येष्ट चिरंजीव असून त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनिया येथून इकोनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ई-स्वास्थ आणि पीरामल रिअॅलिटी हे दोन स्टार्टअप सुरु केले. सोबतच ते पीरामल ग्रुपचे एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. ‘इंडियन मर्चट चेम्बर’च्या यूथ विंगचे ते सर्वात कमी वयाचे अध्यक्ष राहिले आहेत. 


पुढील स्लाईड्सवर बघा, ईशा आणि आनंद यांच्या साखरपुड्याची खास झलक छायाचित्रांमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...