आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिर्यारोहकांचे मृतदेह शोधण्यासाठी जगातील सर्वात मोठी मोहीम, टीममध्ये १५ उत्कृष्ट गिर्यारोहक, एव्हरेस्ट चढाई करणाऱ्या ४ जणांचाही समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चमोली - ३८ दिवसांपूर्वी अर्थात २५ मे रोजी नंदादेवी पर्वताच्या बेस कॅम्पवरून बेपत्ता ८ गिर्यारोहकांपैकी ७ जणांचे मृतदेह काढण्यात यश मिळाले आहे. हे अतिशय कठीण काम १८ जिगरबाज गिर्यारोहकांच्या टीमने पूर्ण केले. ८ पैकी ७ जणांचे मृतदेह त्यांनी बाहेर काढले. आयटीबीपीचे पीआरआे विवेककुमार पांडेय म्हणाले, गिर्याराेहकांना शोधण्यासाठी जगातील सर्वात मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. १४ जूनपासून प्रयत्न करणाऱ्या टीमला आता यश मिळाले यावरून या मोहिमेचा अंदाज बांधता येऊ शकेल. या टीममध्ये जगातील सर्वोत्कृष्ट १५ गिर्यारोहक व मदतकार्यातील तज्ञांचा समावेश होता. त्यापैकी ४ जणांना एव्हरेस्ट चढाईचा अनुभव गाठीशी होता.   


मोहीम चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीची परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. १३ मे रोजी १२ गिर्यारोहकांची टीम नंदादेवी पर्वताची चढाईसाठी निघाली होती. ३० तारखेला पितोडगड जिल्हा प्रशासनाला बेस कॅम्पमध्ये काही पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली. आयटीबीपीच्या मदतीची मागणी केली गेली. १ जून रोजी ४ गिर्यारोहकांना एअरलिफ्ट करण्यात आले. बाकी ८ बेपत्ता हाेते. ३ जून रोजी एरिअलव्ह्यूने मृतदेह दिसले होते. 


हवामान खराब असल्याने हवाई दल अयशस्वी
मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांना काढण्यासाठी हवाई दलाने प्रयत्न केले, परंतु वाईट हवामान व वादळी वाऱ्यामुळे मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. अखेर १४ जूनपासून आयटीबीपीने गिर्यारोहकांच्या मृतदेहांना काढण्यासाठी जगातील सर्वात मोठे मदतकार्य सुरू केले. २५ दिवस चाललेले हे मदतकार्य अखेर यशस्वी ठरले. 


माेहीम गिर्यारोहकांच्या सन्मानार्थ
बेस कॅम्पमधून मृतदेह काढणे अतिशय कठीण होते. म्हणूनच देश गिर्यारोहकांच्या सन्मानार्थ ही मोहीम पूर्ण करेल, असा निर्णय आम्ही घेतला. २२ जून रोजी टीमने मृतदेह शोधले. ७ मृतदेह दोरीने परस्परांशी बांधलेले होते. त्यावरून गिर्यारोहकांना धोक्याची पुरेशी कल्पना हाेती, असे म्हणता येईल. आधी बचाव पथकाने हे मृतदेह सुरक्षित ठिकाणी आणले. तेथून एअरलिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शक्य झाले नाही. अखेर सर्व मृतदेह सुरक्षित उंचीवर आणण्यात आले. ही मोहीम जगातील वेगळी मोहीम ठरली. - सुरजितसिंह देसवाल, आयटीबीपीचे महासंचालक 


७ हजार शिखरांची चढाई करणारे १५ गिर्यारोहक 
टीममध्ये ७ हजार शिखरांची चढाई करणाऱ्या १५ गिर्यारोहकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची एक महिलाही त्यात होती. गिर्यारोहकांचे मृतदेह १९ हजार फूट खोल कोसळले होते. ते परत आणण्यासाठी १० दिवस लागले.

बातम्या आणखी आहेत...