आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न बघून अल्पवयीन मुलाने 10 वर्षीय मुलावर केला अत्याचार, हत्या करून डेडबॉडीची अशी लावली विल्हेवाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या 10 वर्षीय मुलाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. आरोपीने आपल्या आई-वडिलांच्या मोबाइलवर गेम खेळण्याच्या बहाण्याने पॉर्न व्हिडिओ पाहिला. नंतर आपल्या मित्रावर अत्याचार केला. पकडल्या जाण्याच्या भीतीने त्याने त्याचा गळा आवळून खून केला. आरोपीने मृतदेहाचा विल्हेवाट लावण्यासाठी अापल्या एका मित्राची मदत घेतली. आरोपीचा हत्येचा कट जाणून घेतल्यानंतर पोलिसही चक्रावले आहेत.

 

साकीनाका पोलिसांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पांढऱ्या पूलाजवळील नाल्यात ट्रॉली बॅगमध्ये 10 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. संबंधित घटनेच्या तपासानंतर 15 वर्षीय मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.  आरोपींना आपला गुन्हा मान्य करत दोघांनीच डेडबॉडीला ट्रॉली बॅगमध्ये भरून साकीनाका येथील नाल्यात फेकले असल्याचे सांगितले. 

 

- आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले की, तो आई-वडिलांच्या मोबाइलवर गेम खेळत होता. एक दिवस गेम खेळत असताना आलेल्या पॉप अॅपवर क्लिक केल्यानंतर त्यावर पॉर्न व्हिडिओ दिसण्यास सुरुवात झाली होती. ते पाहिल्यानंतर तो रोज गेम खेळण्याच्या बहाण्याने पॉर्न बघत होता. व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला सेक्स करण्याची इच्छा झाली होती. 

 

- आरोपी गुरुवारी संध्याकाळी ट्यूशनवरून आलेल्या निष्पाप मुलाला आपल्यासोबत घरी घेऊन आला. तेथे पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर त्याच्यासोबत सेक्स केला. मुलाने याचा विरोध केला असता, आपल पितळ उघडे पडेल या भीतीने आरोपीने त्याची हत्या केली. 


मृतदेहाला ठिकाणावर लावण्यासाठी मित्राने केली मदत

- आरोपीने मु्लाच्या हत्येनंतर आपल्या मित्राच्या साथीने डेडबॉडीला ट्रॉली बॅगमध्ये भरून नाल्यामध्ये फेकले. 

 

- आरोपींचा चलाख डोके आणि डेडबॉडीची विल्हेवाट लावण्याच्या प्लॅनविषयी पोलिसांना माहीत झाल्यावर ते सुद्धा चक्रावून गेले होते. आरोपींना या घटनेला अपहरणानंतर झालेला मृत्यू दाखवण्यासाठी क्राइम शो पाहून योजना आखली होती. 

 

- ठरलेल्या योजनेप्रमाणे मुख्य आरोपीने तिसऱ्या मुलाच्या मदतीने मुलीच्या घरी करून पाच रूपयांची खंडणी मागितली होती. आरोपीन त्याला एक फोन करण्यासाठी 20 हजार रूपये देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर आरोपीने सिम तोडून फेकून दिले.

बातम्या आणखी आहेत...