आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हैदराबाद : येथील एका अनाथ आश्रमात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आश्रमच्या बाथरूममधून मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्यासोबत राहणाऱ्या मुलींनी तिला बाथरूममध्ये जाताना पाहिले होते. पण मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांसाठी सुद्धा मुलीचा मृत्यू एक रहस्य बनला आहे. हा आश्रम तेथील खराब व्यवस्थेमुळे सुरुवातीपासूनच निशाण्यावर आहे.
बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली मुलगी
- अलेअर भागातील बॅक टू बॅक अनाथ आश्रमातील प्रकरण आहे. मुलगी याठिकाणी गेल्या पाच वर्षापासून राहत होती. जेएमजे इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
- एस.आय वेंकट रेडडी यांनी सांगितले की, मुलगी आणि तिचे चार रूममेट्स सकाळी 4.30 वाजता उठून हॉलमध्ये अभ्यास करत बसले होते. यानंतर 6.30 वाजता मुलगी बाथरूममध्ये गेली होती. काहीवेळाने तिची एक रूममेट बाथरूममध्ये गेली असता तिला ती मुलगी तेथे बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर पडलेली दिसली. यानंतर तिला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
अंगावर नव्हते कोणतेही निशाण
- पोलिसांनी सांगितले की, मुलगी बाथरूममध्ये पडल्यानंतर तिच्या शरीरावर कोणतेही निशाण आढळले नसल्याचे रूममेट्सचे म्हणणे आहे.
- मुलीचा अचानकपणे झालेला मृत्यू पोलिसांसाठी एक कोडे बनले आहे. कारण तिच्या मृत्यूविषयीचा कोणताच सुगावा त्यांच्या हाती लागला नाहीये. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- अलेअर भागातील हे अनाथ आश्रम सुरुवातीपासून पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. तसेच आपल्या खराब सुरक्षा व्यवस्थेमुळे चर्चेमध्ये आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.