आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ वर्षीय मुलाकडून १६ वर्षाच्या मुलीला उचलून नेण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-मोतीनगर परिसरातील एका संगणक केंद्रात एमएससीआयटीच्या प्रशिक्षणासाठी येणाऱ्या सोळा वर्षीय मुलीला परिचित असलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाने मोबाइलवर वारंवार कॉल करून त्रास दिला. तसेच उचलून घेऊन जाईल, अशी धमकीसुद्धा दिली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांंनी सोमवारी पंधरा वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बडनेरापासून जवळच असलेेल्या गावात राहणारी एक मुलगी एमएससीआयटीचे प्रशिक्षण घेण्यासाठी शहरातील मोतीनगरमधील एका संगणक केंद्रात येते. तो मुलगासुद्धा मुलीच्याच गावचा असून तोसुद्धा त्याचठिकाणी येतो. दरम्यान त्या मुलाने मुलीचा मोबाइल क्रमांक घेवून त्यावर कॉल केले प्रत्येकवेळी मुलीला लज्जा निर्माण होईल, अशा घााणेरड्या भाषेचा वापर करून मागणी करत होता. वारंवार त्याचा हा त्रास सुरू झाल्यामुळे तीने हा विषय घरी सांगितला. त्यावेळी त्याने पुन्हा मुलीला कॉल करून तुला उचलून घेऊन जाईन, अशी धमकी दली. धमकीमुळे मुलगी घाबरली आणि तिने सोमवारी (दि. ३) फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून मुलाविरुद्ध तक्रार दिली. 

बातम्या आणखी आहेत...