आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 15 Year Old Girl Bleeded From Eyes By A Mysterious Illness

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीला झाला जगातील सर्वात रहस्यमयी आजार; फुग्यासारखा फुगला चेहरा, डोळ्यातून सुरू झाला रक्तस्त्राव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिस्सोरी- अमेरिकेतील मिस्सोरीत एका अल्पवयीन मुलीला रहस्यमयी आजार झाल्याचे समोर आले आहे. जॉर्डन वॉकर (वय 15) असे या मुलीचे नाव असून तिला झालेला आजार पाहून डॉक्टरही हैरान झाले आहे. एका वर्षाआधी जॉर्डनला एका दुर्मिळ आजाराने घेरले होते. त्यामुळे तिची वास घेण्याची आणि चव ओळखण्याची क्षमता नष्ट झाली होती. त्यानंतर अचानक मागील काही दिवसांपासून तिच्या चेहऱ्यावर सूज आल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाख करण्यात आले. परंतू हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच तिच्या दोन्ही डोळ्यांतून रक्तस्त्राव सुरू झाला. 

 

डोळ्यातून वेगाने सुरू होता रक्तस्त्राव

जॉर्डनच्या डोळ्यातून होणारा रक्तस्त्राव इतका वेगाने होता की जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिच्या चेहऱ्यावरील दोन हाडांना काढावे लागले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, साधारण मनुष्याच्या डोळ्यांवर 12 ते 22 एमएमपर्यंतचा दाब असतो परंतू जॉर्डनच्या रहस्यमयी आजारामुळे तिच्या डोळ्यांवर 85 एमएमचा दाब पडत होता. त्यामुळे तिचे दोन्ही डोळे फूटल्याने ती दृष्टीहीन झाली. 

 

डॉक्टरही नाही शोधू शकले जॉर्डनला झालेला रहस्यमयी आजार
जॉर्डनच्या कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, एके दिवशी जॉर्डन कुटुंबियांसह पार्टीसाठी क्रूझवर गेले होती. तेव्हा अचानक तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर तिची वास घेण्याची आणि चव ओळखण्याची क्षमताही नष्ट झाली होती. त्यानंतर जॉर्डनला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला झालेला रहस्यमयी आजार शोधण्याचा बराच प्रयत्न केला. परंतू आज एक वर्षानंतरही त्यांना या आजाराविषयी कळू शकले नाही. 

 

जॉर्डनच्या भयानक आजारामुळे तिचे कुटुंबही खचले
15 वर्षीय जॉर्डनला झालेल्या भयानक आजारामुळे तिचे कुटुंबही खचून गेले आहे. लवकरात लवकर जॉर्डनला झालेला आजार ओळखून तिच्यावर उपचार सुरू व्हावे यासाठी तिच्या कुटुंबियांनी 'गो फंड पेज'च्या माध्यमातून मदतीचे अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या जॉर्डनवर उपचार सुरू असून जगभरातून तिच्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहे. 
 

पुढील स्लाइडवर पाहा Photos...