क्राइम / 15 वर्षीय मुलीचा सावत्र बापाकडून खून; पुण्यातील दापोडीची घटना, बलात्कार झाल्याचा पोलिसांना संशय

  • गळा आवळून घेतला मुलीचा जीव

प्रतिनिधी

Dec 13,2019 01:32:17 PM IST

पुणे- पुण्यातील दापोडीमध्ये 15 वर्षीय मुलीचा बापाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीच्या बहिणीला राहत्या घरात गुरुवारी मृतदेह आढळून आला. पोलिसांना मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे.


भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास दापोडी येथे एका घरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. मृत मुलीची बहीण शाळेतून घरी आली तेव्हा घराला बाहेरून कुलूप होते. बराच वेळ तिने वाट पाहिली, त्यानंतर कंटाळून अखेर कुलूप तोडले आणि गंभीर घटना समोर आली. या अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून सावत्र वडिलाने केल्याचा संशय भोसरी पोलिसांना व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी फरार वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मुलीवर बलात्कार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याबाबत स्पष्टता शवविच्छेदन अहवाल नंतर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

X
COMMENT