आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंक होल वाटले, पण तपासात निघाले 150 फूट लांब भुयार; चोरट्यांनी बँक एटीएमपर्यंत पोहोचण्यासाठी करत होते वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉश्गिंटन- अमेरिकेच्या पेमब्रोक पाइन्स शहरात एका रस्त्यावर खड्डा होता. लोकांना तो सिंक होल वाटला. पण तपासात तो १५० फूट लांबीचा सुरुंग निघाला. अमेरिकी तपास संस्था एफबीआयच्या मते, चोरट्यांनी हे भुयार बँकेच्या तळापर्यंत खोदलेले होते. या खड्ड्याची एका मोटारसायलस्वाराने तक्रार दिली होती. पोलिस याचा तपास करत आहेत. हा खड्डा भरण्यासाठी आलेल्या पथकाला संशय आला. त्यांनी पोलिस व एफबीआयला बोलावले. 

 

सुमारे २ ते ३ फूट रुंदीच्या या खड्ड्यात उतरल्यानंतर समजले की, हा खड्डा भुसभुशीत नव्हे, तर चोरट्यांनी रचलेला कट आहे. खड्ड्यात उतरताना आधी एक जनरेटर व विजेच्या तारा सापडल्या. आत गेल्यानंतर एक भुयार समोर दिसले. त्यात शिडी, बूट व स्टूल सापडले. चोरटे याच सुरुंगातून बँकेच्या एटीएमपर्यंत जाणार होते. हे भुयार खोदण्यासाठी टोळीच कार्यरत होती. मात्र, लोकांची नजर चुकवून हे काम कसे सुरू होते, हेही एक आश्चर्यच आहे. 

 

पावसाने खड्डा खचला :

अधिकाऱ्यांनी सांगितले, भुयार संपलेले आहे की नाही, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु पावसामुळे खड्डा खचला होता. पेमब्रोक पाइन्सच्या बांधकाम विभागाने याप्रकरणी काही सांगण्यास नकार दिला. मात्र, एफबीआय अधिकाऱ्यांनी चोरांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. काही संशयितांची छायाचित्रे प्रसिद्धीस दिली आहेत. आता चोरट्यांना शोधण्यासाठी एफबीआयने ड्रोनची मदत घेतली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...