आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा किल्ला पूर्वी खासगी बंगला, नंतर लष्करी तळ, आणि प्राणिसंग्रहालयही बनला, आता आहे अपार्टमेंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील डर्बिशायर येथील मॅटलॉक परिसरातील हा रायबर किल्ला. गॉथिक व्हिक्टोरियन शैलीत बांधलेला हा किल्ला सुमारे 156 वर्षांपूर्वीचा आहे. 1862 मध्ये जॉन समेडले या उद्योगपतीने राहण्यासाठी म्हणून हे घर बांधले होते. ते सुमारे 660 फूट उंचीवर बांधलेले आहे. यासाठी ग्रिटस्टोन येथील खाणीतून मोठमोठे दगड आणले गेले होते. या बंगल्यापासून दूरदूरवर कुठेही पाणी वा इतर सुविधा नाहीत. त्यामुळे हा बंगला म्हणजे समेडलेचा मूर्खपणा असे म्हटले जात होते. 


1930 मध्ये पैशांच्या कमतरतेमुळे त्याचे रूपांतर शाळेत करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धातील लष्कराने त्याचा तळ म्हणून वापर केला. 1960 ते 2000 पर्यंत येथे जंगली प्राण्यांचे संग्रहालय होते. 2006 मध्ये ते अपार्टमेंटमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय झाला. २०१४ मध्ये ते आकारास आले. आता त्यात फ्लॅट्स काढले जात आहेत. 22 जून 1950 रोजी युनेस्कोने ही इमारत जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली होती. 


कॅलिफोर्नियात राहणाऱ्या झोन क्लार्क यांनी हे छायाचित्र टिपले आहे. त्यासाठी त्यांना सुमारे ४ तास प्रतीक्षा करावी लागली. विशेष म्हणजे ब्रिटिश फोटोग्राफी अवॉर्ड््स स्पर्धेसाठी या फोटोची निवड झाली आहे. स्पर्धेचे निकाल जानेवारी महिन्यात घोषित होतील. 

बातम्या आणखी आहेत...