आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या साखरपुड्याच्या केकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फ्लोरल डिझाइनचा हा व्हाइट आणि पिंक केक चर्चेचा विषय ठरला आहे. या थ्री टायर केकचे वजन तब्बल 15 किलो होते. केक वजनी असल्याने तीन लोकांना तो वेन्यूपर्यंत पोहोचवावा लागला.
केकचे सौंदर्य वाढवण्यासाठी करण्यात आला 24 कॅरेट सोन्याचा वापर....
- रिपोर्ट्सनुसार, टियर नॉम पेतेसरी (Tier Nom Patisserie)च्या Vahishta Zandbaf यांनी हा केक तयार केला होता. केकचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यांनी 24 कॅरेट गोल्डची पानं, गॉर्जियस पिंक सिम्बिडियम ऑर्किड, हाइड्रेंजिया आणि जामुनचा वापर केला.
- प्रियांकाने 18 ऑगस्ट रोजी अमेरिकन बॉयफ्रेंड आणि सिंगर निक जोनाससोबत साखरपुडा केला. यासाठी निक त्याच्या आईवडिलांसोबत मुंबईत आला होता. शनिवारी सकाळी प्रियांकाच्या राहत्या घरी रोका सेरेमनी झाली. त्यानंतर रात्री घरी कुटुंबीय आणि मित्रांसाठी एक छोटेखानी पार्टी आयोजित करण्यात आली होती.
- रविवारी संध्याकाळी निक आईवडिलांसोबत अमेरिकेला रवाना झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.