आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 16 Inch MacBook Pro Sales Starts In India, Apple Gave T2 Security Chip For Data Safety

16-इंच मॅकबुक प्रो ची भारतात विक्री सुरू, डेटा सेफ्टीसाठी कंपनीने दिली अॅपल टी-2 सिक्योरिटी चिप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16-इंच मॅकबुक प्रो मॉडलची भारतात किंमत 1,99,900 रुपयांपासून सुरू होईल

गॅजेट डेस्क- अॅपलने आपल्या नवीन 16-इंच मैकबुक प्रो ची विक्री भारतात सुरू केली आहे. 1,99,900 रुपयांपासून या मॅकबुकची सुरुवात आहे. कंपनीने याला 15-इंच मॅकबुक मॉडलशी रिप्लेस केले आहे. न्यू मॅकबुकच्या कीबोर्डला परत नव्याने डिझाइन केले आहे. तसेच, याचा परफॉर्मेंस 80 टक्के वाढवण्यात आला आहे. ग्राहकांना हा मॅकबुक अॅपल स्टोर किंवा ऑनलाइन मिळू शकेल.

16-इंच अॅपल मॅकबुक प्रोची किंमत

16-इंच मॅकबुक प्रो मॉडलची सुरुवात 1,99,900 रुपयांपासून आहे. याला दोन वेगवेगळ्या प्रोसेसरमध्ये 2.6GHz 6-कोर इंटेल कोर i7 आणि 2.3GHz 8-कोर इंटेल कोर i9 मध्ये आणले आहे. दोन्ही मॉडलमध्ये 16GB रॅम दिली आहे. अमेझॉनवर 16-इंच मॅकबुक प्रो (16GB रॅम, 512GB स्टोरेज, कोर i7) ला 1,89,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर, कोर i9 व्हॅरिएंटला 2,29,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 

16-इंच मॅकबुक प्रोचे स्पेसिफिकेशन

अॅपल 16-इंच मॅकबुकमध्ये सीजर-बेस्ड किबोर्ड स्विच दिले हे. यात 16-इंच स्क्रीन आहे, ज्याचे रेझोल्यूशन 3072x1920 पिक्सल आहे. तर, पिक्सल डेनसिटी 226ppi  आहे. यात टच बार आणि टच आयडी फिंगरप्रिंट सेंसरदेखील आहे. डेटा सेफ्टीसाठी यात अॅपल टी-2 सिक्योरिटी चिप दिली आहे.