आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाडमध्ये घराला भीषण आग, 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यू, आईसह सात जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- करमाड जवळील शेवगा येथे घराला भीषण आग लागली. या आगीत 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाला. मुलाच्या आईसह सात जण या आगीत गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी पोहोचले.

 

मिळालेली माहिती अशी की, 18 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेवगा येथील जावेद बेग वाहेद बेग यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. क्षणात आग घरभर पसरली. या आगीत नूर मोहम्मद जावेद बेग हा चिमुकल्याचा गंभीर भाजला गेला. सोबत तसेच घरातील सात जणही आगीत होरपळून गंभीर जखमी झाले. नूरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जकिरा बी जावेद बेग 30 महेक जावेद बेग 8 यास्मिन राजू बेग 28 अनिस बेग राजू बेग 12 अरमान बेग राजू बेग 10 सुहाना इलियास बेग 9 सुरय्य इलियास बेग  32 अशी जखमींची नावे आहेत. सगळ्यांवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

बातम्या आणखी आहेत...