आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवार 16 नोव्हेंबर रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
आज तुमचा बराचवेळ घराबाहेरच जाणार आहे. तरूणांना कुसंगत आकर्षित करेल. गृहीणींच्या जबाबदाऱ्या वाढतील. कायदा तंतोतंत पाळा.
कितीही वाढते खर्च असले तरी पैशाची कमतरता भासणार नाही. आज स्वत:ची हौस भागवण्यासाठी सढळ हस्ते खर्च कराल. प्रवासात रखडपट्टी होईल.
कोणत्याही क्षेत्रात असलात तरी काही चढाओढीचा सामना करावाच लागेल. जुन्या अनुभवींचे सल्ले उपयुक्त ठरतील. जोडीदाराकडून सुवार्ता येतील.
काही क्षुल्लक अडचणी मन:स्वास्थ्य बिघडवतील. घरात वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. एखाद्या समारंभात किंवा प्रवासात मौल्यवान ऐवज जपा.
तुम्ही योग्य वेळी घेतलेले अचूक निर्णय योग्य ठरतील. प्रगतीच्या दिशेनेच तुमची वाटचाल चालू राहील. गृहीणींना काटकसर करण्याची गरज नाही.
कार्यक्षेत्रातील मानसन्मान वाढेल. विरोधकांचा विरोध मावळेल. आज मित्रमंडळींच्या फार नादी न लागणे हिताचे, कारण ते चुकीचा मार्ग दाखवतील.
उच्चशिक्षित मंडळींना विदेशात नोकरीच्या संधींची चाहूल लागेल. आज तुमचा देवधर्म व दानधर्माकडे ओढा असेल. आजी आजोबा नतवंडात रमतील.
आज भावना व कर्तव्य याचा ताळमेळ साधणे कठीण जाईल. कदाचित घरातील वडीलधाऱ्यांची नाराजी पत्करावी लागेल. मोहापासून दूर रहा, प्रतिष्ठेस जपा.
महत्वाच्या चर्चा व बैठकी यशस्वी होतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्ती करू शकाल. वैवाहीक जोडीदाराशी छान सूर जुळतील. मस्त दिवस.
आज आर्थिक अंदाज कोलमडण्याची शक्यता आहे.काही अनपेक्षित खर्च दार ठोठावतील. ज्येष्ठांना काही अरोग्यविषयक चाचण्या करून घ्यावा लागणार अहेत.
आज तुमचा ऐषआरामी जिवनाकडे कल राहील. मोठेपणा घेण्यापायी खर्च ओढाऊन घ्याल. मित्रांनी केलेल्या खोटया स्तुतीने भाराऊन जाल. चैन कराल.
कुटुंबात सामंजस्याचे वातावरण असल्याने आज तुम्ही प्रसन्नचित्त असाल. घराबाहेरही आपल्या कतृतवाचा ठसा उमटवू शकाल. मुलांना दिलेले शब्द पाळाल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.