आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घाेटाळा प्रकरणात १६ दाेषी, ११ जणांना ३ वर्षे कैद; पाच दाेषींना प्रत्येकी चार वर्षांचा कारावास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - बिहारच्या चारा घाेटाळ्यातील एका प्रकरणात झारखंड राजधानी रांची येथील केंद्रीय तपास संस्थेच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने बुधवारी १६ दाेषींपैकी ११ जणांना प्रत्येकी तीन, तर पाच जणांना प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा ठाेठावण्यात आली. 


विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.एन. मिश्रा यांच्या न्यायालयाने चाईबासा काेषागारातून ३७.७० काेटी रुपयांच्या अवैध व्यवहार प्रकरणात १६ दाेषींना ही शिक्षा ठाेठावली. न्यायालयाने यापूर्वी १५ मे २०१९ राेजी सुनावणी पूर्ण करून निर्णय सुरक्षित ठेवला हाेता.


या प्रकरणात न्यायालयाने उमेश दुबे, महेंद्र कुंदन, बसंत सिन्हा, किशाेर झा, राम अवतार शर्मा यांना चार, तर भारतेश्वर नारायण, अपर्णिता कुंडू, राजेंद्र कुमार हरित, अदिती जाेदार, लाेल माेहन गाेप, विमल कुमार अग्रवाल, शाहदेव प्रसाद, ब्रजकिशाेल अग्रवाल, मधू, संजीव कुमार  वासुदेव, अनिल कुमार यांना प्रत्येकी तीन वर्षांचा कारावासाची शिक्षा झाली हाेती. या दाेषींना सात लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद व बिहारचे माजी मुख्यमंत्री डाॅ. जगन्नाथ मिश्र यांच्यासमवेत ४६ आराेपींना २०१३ मध्ये शिक्षा ठाेठावली हाेती. या प्रकरणाशी संबंधित इतर १८ आराेपींच्या विराेधात सीबीआयने न्यायालयात आराेपपत्र दाखल केले हाेते