आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUBG गेम खेळताना 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, 'ब्लास्ट कर.. ब्लास्ट कर' असे ओरडत असाताना आला झटका..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर(मध्यप्रदेश)- ऑनलाइन गेम पबजी दिवसेंदिवस विकृत रूप घेताना दिसत आहे. रोजच यामुळे मृत्यूसारख्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारची घटना मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात घडली आहे. येथील एक 16 वर्षीय मुलाचा पबजी गेम खेळत असताना कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे नाव फुरकान कुरैशी आहे, तो 12 वीत शिकत होता. फुरकानच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 


झाले असे की, फुरकान सगल 6 तासांपासून पबजी खेळत होता. मृत्यूपूर्वी तो जोर-जोराने ओरडत होता- 'ब्लास्ट कर.. ब्लास्ट कर', त्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्यानंतर, त्याला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषिक केले. कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर अशोक जैन यांनी सांगितले की, फुरकानचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला आहे, त्याला खेळताना एखादा झटका लागला असावा. तो बराच वेळ तणावात खेळत होता. खेळताना त्याच्या ह्रदयाचे ठोके वाढले आसावेत आणि त्यामुळेच त्याला झटका आला.


फुरकानचे वडील हरून राशिद यांनी सांगितले की, आम्ही काही दिवसांपूर्वीच एका नातलगाच्या लग्नानिमीत्ती नीमचला आलो होतो. मी लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो, मी त्याला अनेकवेळे गेम खेळण्यापासून रोखले होते, पण तो ऐकत नव्हता आणि तासंतास पबजी खेळत होता. तो जेव्हा गेम खेळत होता, तेव्हा त्याच्या बाजुला त्याची बहिणदेखील होती. 

 

फुरकानची बहिण फिजाने सांगितले की, फुरकान अचानक जोर-जोराने ओरडू लागला- 'ब्लास्ट कर.. ब्लास्ट कर, यार अयान तु मला हरवलेस, आता मी तुझ्यासोबत कधीच खेळणार नाही. असे म्हणून तो खाली कोसळला.' त्यानंतर कुटुंबीयांनी फुकरानला तत्काळ रूग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 


Gaming Disorder: WHO ने आजारांच्या लिस्टमध्ये केले सामील
गेमिंगचे व्यसन किंवा गेमिंग डिसऑर्डर आता अधिकृतरित्या जागतिक आरोग्य संघटना(WHO) च्या आजारपणाच्या यादीत सामील करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या 2018 च्या आजारपणाच्या लिस्टमध्ये 'गेमिंग डिसऑर्डर'ला सामील करण्याचा प्रस्ताव दिला होता. स्विट्जरलंडच्या जेनेवामध्ये एक अॅनुअल जनरल मीटिंगदरम्यान, सदस्य देशांनी अधिकृतरित्या पीसी, कंसोल आणि स्मार्टफोनवर गेमिंगच्या व्यसनाला एक आंतरराष्ट्रीय आजारपणाची मान्यता दिली आहे. 'गेमिंग डिसऑर्डर' आता WHO च्या मॉडर्न डिसीजच्या लिस्टमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरण (ICD) मध्ये नवीन अॅडिशन आहे.