आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 16 Year Old Daughter's Deal For 20 Thousand By Mother In Rewari

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियकरासोबत रचला कट, आईनेच केला अल्पवयीन मुलीचा 20 हजारात सौदा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेवाडी(हरियाणा)- 6 वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या आईचा अचानक फोन आला. महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स बनवायचे आहे, असे कारण सांगून आपल्या जवळ बोलवले. मुलगी तेथे गेल्यावर हातात नवीन कपडे दिले आणि सांगितले की, तुझे लग्न होणार आहे. त्यानंतर मुलीने आरडा-ओरड केली आणि तेथून पळून गेली. त्यानंतर पोलिस न्यायाधिशांसह तेथे गेले. चौकशी केल्यावर कळाले की, मुलीला 20 हजार रूपयांसाठी आईनेच विकले होते.


कोलकात्तात राहणारी मुस्कान 8वीत शिकते, तिला एक छोटी बहिण आहे. 13-14 वर्षांपूर्वी वडिलांनी त्यांना सोडून दुसरे लग्न केले होते. त्यानंतर आईनेही ताहीर नावाच्या यावकासोबत लग्न केले आणि भिवाडीत राहु लागली, तेव्हापासून दोघी मुली कोलकत्त्यात आजीकडे राहत होत्या. 16 वर्षीय मुस्कान एका चॅरीटी स्कुलमध्ये 8 व्या वर्गात शिकत होती. काही दिवसांपूर्वी आईने फोन करून महत्त्वाची डॉक्यूमेंट्स बनवायची आहेत, असे कारण सांगून बोलवले. 25 डिसेंबरला आजीने त्यांना तिथे बोलवले. येथे मुलीच्या लग्नाची बाब कळाल्यावर आजीने विरोध केला आणि मुलींना घेऊन परत गेली. ट्रेनमध्ये त्यांचा पाठलाग तरत आरोपी दिल्लीत गेले. तेथे मुलींना सामान घेऊन देण्याच्या बहाण्याने भिवाडीला नेले. मुलीला बलजबरीने आरोपींकडे नेले जात असताना तिने गोंधळ केला. त्यानंतर तेथे लोक जमले आणि त्यांनी पोलिसांना बोलवले आणि त्यांनी मुलीला आशाकिरण अनाथाश्रमात पाठवले.


सावत्र वडिलांसह दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल
कोलकात्तात राहणारी 16 वर्षीय मुस्कान (काल्पनिक नाव) च्या हिमतीने तिचे आयुष्य खराब होण्यापासून वाचवले. रेवाड़ीचे अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी मोहित अग्रवाल यांनी काउंसलिंग करून प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह मुलीला खरेदी करणाऱ्या आरोपींना अटक केले.