आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांच्या मुलाचा तरुणीवर जडला ऑनलाइन जीव, भेटण्यासाठी 7000 km दूर आला, पण नकार देताच केली तिची निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया - रशियामध्ये एका 16 वर्षाच्या मुलाच्या राक्षसी कृत्याने सर्वांना धक्का बसला. 7000 किमी अंतरावर राहणाऱ्या एका तरुणीच्या निर्घृण हत्येचा तो दोषी आहे. मॉस्कोतील क्रिस्टीना कॅमरेवेया 2 महिन्यांपासून बेपत्ता होती. पोलिस अनेक दिवसांपासून तिचा शोध घेत होते. एक दिवस पोलिसांना तिच्या फेसबूक अकाऊंटवर एक चॅट मिळाला. त्याआधारे पोलिसांनी ती फेसबुक फ्रेंडला भेटायला खाबरोस्कला गेली होती, हे शोधून काढले. 


पोलिसांनी सांगितले की, त्यांना चॅटद्वारे दोघे भेटल्याची माहिती मिळाली होती. पण पोलिसांनी खाबरोस्कमध्ये मुलाकडे चौकशी केली तेव्हा त्याने मात्र नकार दिला. पण एका पोलिस अधिकाऱ्याला संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची लाय डिटेक्टर टेस्ट केली. त्यात जे समोर आले त्याने सर्वांनाच धक्का बसला. 


7000 किमीचा प्रवास करून घेतली भेट 
लाय डिटेक्टर टेस्टनंतर समजले की, मुलगा फेसबूक फ्रेंड क्रिस्टिनाला भेटण्यासाठी मॉस्कोमध्ये गेला होता. एवढ्या मोठ्या विमान प्रवासासाठी त्याने सेव्हींग अकाऊंटमधून पैसे काढले होते. त्याने क्रिस्टीनाला मॉस्कोला पोहोचल्यानंतर भेटायला बोलावले होते. तो म्हणाला की, तो आईबरोबर एका लग्नासाठी तेथे आला आहे. क्रिस्टीना मैत्री म्हणून त्याला भेटायला पोहोचली आणि घरी आईला म्हटले की, ती फ्रेंडच्या घरी जात आहे. त्यानंतर क्रिस्टीना कधीही परतली नाही. 


यामुळे केली हत्या 
मॉस्कोला पोहोचल्यानंतर पहिल्यांदाच दोघे भेटले होते. पण क्रिस्टीना आधी मित्रांबरोबर होती, त्यामुळे तिला पोहोचायला जरा उशीर झाला होता. त्यावर तो नाराज झाला होता. त्याने क्रिस्टीनाला म्हटले की, त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे आणि तिच्याबरोबर त्याला राहायचे आहे. पण क्रिस्टीनाने त्याल नकार दिला. नकार देताच त्याने तिची हत्या केली. जो फ्लॅट त्याने भाड्याने घेतला होता, त्याच फ्लॅटमध्ये त्याने क्रिस्टीनाचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते पाण्यात फेकले. आजवर पोलिसांना क्रिस्टीनाच्या शरिराचा एकही अवयव मिळालेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...