आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 16 Year Old Girl After R Aping Blackmail By Instagram Friend In Raipur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीचा व्हिडीओ बनवून केले ब्लॅकमेल, लुबाडले 3.50 लाख रूपये, आजीने पासबूक अपडेट केल्यावर समोर आला घडलेला प्रकार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपुर- कमल विहारमधल्या 18 वर्षांच्या आदर्श अग्रवालने अंदाजे 4 महिन्यांपूर्वी 16 वर्षांच्या मुलीसोबत इंस्टाग्रामवरून मैत्री केली. काही दिवसानंतर दोघे भेटु लागले, एकाच भेटीत दोघात शारिरीक संबंध बनले आणि त्या दरम्यान मुलाने व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ मुलीला पाठवला, ते पाहून मुलगी घाबरली. तेव्हापासून तो तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करू लागला.


आजीने पासबूक अपडेट केले म्हणून सत्य बाहेर आले
त्या दरम्यान आरोपीने 4 महिण्यात 3.50 लाख रूपये लुबाडले आणि आपले शौक पूर्ण केले. घाबरलेली मुलगी आपल्या आजीच्या खात्यातून पैसे काढून त्याला देत राहिली. काही दिवसानंतर आजीने जेव्हा पासबूक अपडेट केली तेव्हा हा सगळा प्रकार लक्षात आला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला विचारल्यावर तिने सगळा ब्लॅकमेलींगचा खुलासा केला. त्यानंतर घरच्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच अॅक्शन घेत आदर्शला त्याच्या घरातून अटक केले आणि त्याचा मोबाईल आणि पेनड्राइव्ह जप्त केले.

 

मित्राच्या घरी केला बलात्कार
पोलिसांनी सांगितले की, आदर्श आग्रवाल 12वीत शिकणारा विद्यार्थी आणि एका गुत्तेदाराचा मुलगा आहे. त्याने मुलीचा व्हिडोओ बनवून तिला ब्लॅकमेल करू लागला आणि अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला, त्याशिवाय तिच्याकडून पैसे घेऊन आपले शौक पूर्ण केले.

 

मुलीच्या पैशांवर ऐश करायचा
मुलीने तीन महिण्यापूर्वी आजीच्या एटीएमवरून त्याला 40 हजार रूपये काढून दिले, ते पैसे घेऊन तो गोव्याला गेला. त्यानंतर त्याने तिला आयफोन मागितला, तेव्हाही तिने त्याला पैसे दिले. त्यानंतर जेव्हा त्याला गरज पडत होती तेव्हा तो मुलीला पैशांची मागणी करत असे आणि आपले शौक पूर्ण करत होता. मुलीने त्रस्त होऊन तिचा फोन बंद केला पण तो तिच्या शाळेत पोहचला, आणि तिला मारहाण करत पैसे घेऊन गेला. 

 

पासबुक अपडेटमध्ये झाला खुलासा
सलगच्या त्रासाने मुलगी एकटी राहू लागली, पण कोणालाही काही सांगितले नाही. तिच्या आजीने 15 दिवसांपूर्वी पासबूक अपडेट केले, तेव्हा त्यांना कळाले की, खात्यात 3.50 लाख रूपये कमी आहेत. त्यानंतर बँकेत चौकशी केल्यावर कळाले की, थोडे-थोडे करून हे पैसे काढण्यात आले आहेत. त्यानंतर आजीने मुलीला विचारले आणि मुलीने रडत-रडत सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला. त्यानंतर आजीने कुटुंबातील सगळ्या लोकांना घटना सांगितली आणि त्यांनी अर्ध्या रात्री पोलिस ठाणे गाठले. त्यानंतरपोलिसांनी आरोपी आदर्श आग्रवालला त्याच्या घरातून अटक केले आणि त्याच्याजवळील मोबाईल आणि पेनड्राइव्ह जप्त केला.