आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबर्मिंघम - ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिची मुलगी कशी तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत पळून गेली याची कहाणी सांगितली. सावत्र पित्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या यामुलीने तर त्यांच्याशी लग्नाची इच्छाही व्यक्त केली. सावत्र पित्यानेही होकार दिला. या घटनेच्या 12 वर्षांनंतर मुलीच्या आईने नात्यांवरचा विश्वास उडवणारी कहाणी सांगितली.
ती त्याला स्वतःकडे आकर्षित करत होती
- 54 वर्षांच्या अॅना वॉटकिन्सने सांगितले की, 2007 मध्ये तिच्या जीवनात हा प्रसंग घडला. तिने 2004 मध्ये डेवीडबरोबर दुसरे लग्न केले होते. त्यानंतर तिची मुलगी आणि पती डेवीडबरोबर ती राहत होती. पण 2-3 साल वर्षांनंतर तिला काहीतरी विचित्र जाणवू लागले.
- अॅना म्हणाली की, ती जेव्हा काही कामासाठी बाहेर जायचे तेव्हा मुलगी साराह आनंदी व्हायची. ती जास्तीत जास्त काळ सावत्र वडिलांबरोबर घालवत होती. एकदा रात्री उशिरा साराहला कुठे तरी बाहेर जायचे होते. त्यावेळी डेवीडच्याऐवजी तिची आई साराहला सोडवायला निघाली. तेव्हा साराह तिला डेवीडच्या सोबतच जायचे असल्याचे म्हणत भडकली.
- त्यानंतर अॅनाने एक दिवस खोलीमध्ये साराह डेवीडला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना पाहिले. त्यानंतर सर्वकाही तिच्या लक्षात आले.
दोघे घर सोडून पळून गेले
या प्रकारानंतर अॅनाला राग अनावर झाला. मुलगी आणि तिचा दुसरा पती यांच्यातील नात्याबाबत तिला सर्वकाही समजले होते. पण अॅनाने काही करण्याआधीच ते दोघे घर सोडून पळून देले होते. साराह आणि डेवीडने घर सोडल्यानंतर 2 वर्षांनी लग्न केले. साराह तेव्हा 18 वर्षांची होती. तर डेवीडचे वय 59 होते. दोघांच्या या कृत्याने अॅना खचून गेली होती.
ट्विन्सला दिला जन्म
सावत्र वडिलांशी लग्नानंतर साराहने जुळ्या मुलांना जन्म दिला. या घटनेच्या 12 वर्षांनंतर तिची आई अॅनाने दोघांना माफ करण्याचा निर्णय घेतला. पण साराह मात्र आईला पाहून चांगलीच संतापली. तिने रागात आईला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्नही केला. अॅनाने पोलिसांत साराहच्या विरोधात तक्रार केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.