आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील आणि काकाने अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, मुलीने पाहिला नव्हता मुलाचा चेहरा आणि नावदेखील माहित नव्हते...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोशल अवेअरनेसच्या अनेक कार्यक्रमानंतरही राजधानी दिल्लीत अनेक लोक जुन्या अमानुष चालीरितींना माणतात. असेच एक प्रकरण दिल्लीत घडले आहे, ज्यात वडील आणि काकाने आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावून दिले आहे. त्या मुलीला तिच्या लग्नाच्या एक दिवस आधी लग्नाबाबत सागण्यात आले. मुलगी 16 वर्षांची तर मुलगा 38 वर्षांचा आहे. त्याने अमानविय पद्धतीने मुलीसोबत चारवेळा शारिरीक संबंद बनवले. संधी साधून मुलीने त्याच्या तावडीतून पळ काढला आणि पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून त्या मुलाला तुरूंगात टाकले आणि मुलीचे वडील आणि काकाचा शोध घेत आहेत. सध्या मुलीला एका शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले आहे.


मुलीने मुलाचा चेहरा पाहिला नव्हता आणि नावदेखील माहित नव्हते
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी उत्तरप्रदेशची रहिवासी आहे. तिने 8वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तिला दोन भाऊ आणि चार बहिणी आहेत. एक महिन्यापूर्वी ती आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी गेली होती. 7 मार्चला मुलीचे वडील आणि काकादेखील तेथे गेले. काकाच्या मुलाचे लग्न आहे, असे सांगून तिला गावी परत घेऊन आले. त्यानंतर प्रवासादरम्यान तिला तिच्या लग्नाबद्दल सांगण्यात आले. त्यानंतर एका मंदिरात बळजबरीने तिचे लग्न लावण्यात आले. तिने मुलाचा चेहरा पाहिला नव्हता आणि तिला नावही माहित नव्हते. मुलीने लग्नाचा खूप विरोध केला, पण घरच्यांना तिचे न ऐकता बळजबरीने लग्न लावून दिले.

11 मार्चला आरोपीने मुलीला आपल्या फार्म हाउसवर नेले
लग्न झाल्यानंतर मुलाने मुलीला आपल्या गाझीयाबादवाल्या भावाच्या घरी नेले. तिथे पोहचल्यावर तिला मुलाचे नाव शेरा आहे हे कळाले. तिथे तिच्यासोबत बळजबरीने शारिरीक संबंध बनवण्यात आले. नंतर तिला घेऊन आपल्या फार्म हाउसवर गेला आणि तिथेही त्याने हेच केले. फार्म हाउसवर असताना संधी साधून मुलीने पोलिसांना 100 नंबरवर फोन केला, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीची सुटका केली. पोलिसांन रूग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी केली आणि तिच्या तक्रारीवरून किडनॅपिंग, रेप, पॉक्सो अॅक्ट आणि चाइल्ड मॅरेज अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून मुलाला तरूंगात टाकले. आता पोलिस मुलीच्या वडील आणि काकाचा शोध घेत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...