आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत गुरुवारपासून गाबा मैदानावर खेळवण्यात येईल. ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पाकिस्तानची पहिली लढत असेल. दोन्ही संघ या मालिकेतून १२० गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह या सामन्यात पदार्पण करेल. १६ वर्षे २७८ दिवस वय असलेला नसीम आॅस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू बनेल. तो पाकिस्तानकडून कसाेटीत पदार्पण करणारा सहावा युवा खेळाडू आणि जगातील ११ वा सर्वात युवा खेळाडू बनेल. पाकचा कर्णधार अजहर अलीने त्याला गुरुवारच्या सामन्यासाठी निश्चित केले आहे. अजहरने म्हटले की, “त्याने पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध ८ षटकांच्या स्पेलमध्ये शानदार गोलंदाजी केली. तो खूप तंदुरुस्त आहे. एका प्रथम श्रेणी सामन्यात मी त्याचा कर्णधार होतो. तेव्हा पहिल्यांदा मी त्याची गोलंदाजी पाहिली. त्याने मला प्रभावित केले. खूप कमी खेळाडू असतात, ज्यांना अशी उंची गाठता येते. तो त्यातील एक आहे.’ नसीमच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. तेव्हा तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच होता.
ऑस्ट्रेलिया ३१ वर्षांपासून गाबात पराभूत नाही
आता दोन्ही संघांतील कसोटीचा आलेख पाहिल्यास दोन्ही संघांत आतापर्यंत ६४ कसोटी खेळवण्यात आल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाने ३१ आणि पाकिस्तानने १५ जिंकल्या. १८ कसोटी बरोबरीत राहिल्या. पाकिस्तान टीम ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर १२ सामन्यांत आणि २४ वर्षांत पराभूत करू शकली नाही. त्यांनी सलग १२ कसोटी गमावल्या आहेत. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वेळी नोव्हेंबर १९९५ मध्ये विजय मिळाला होता. ऑस्ट्रेलिया टीम गाबामध्ये (ब्रिस्बेन) १९९८ पासून पराभूत झालेली नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ३० सामने खेळले. त्यातील २३ मध्ये विजय व ७ बरोबरीत राखले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.