आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 16 Year Old Repe Victim Mother And Grandmother Attacked And Threatened By Accused Family Outside Court, Case Registered Against 4, Accused Absconding In Indore

पहीले केला दुष्कर्म आणि आता न्यायालयाच्या आवारात केला पिडीतेवर हल्ला.....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर- आत्याचाराची शिकार झालेली 16 वर्षीय मुलगी, तिची आई आणि आजी यांच्यावर  न्ययालयात आरोपीच्या कुटुंबीयांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात तिघी जखमी झाल्या आहेत. त्यांचा आवाज एैकून सगळे लोक व पोलिस तेथे आले. पण तोपर्यंत सगळे आरोपी तेथून फरार झाले होते. पोलिसांनी आरोपीच्या घरच्यांविरूद्ध मारहानीचा गुन्हा नोंदवला आहे.

 

>> विजय नगर परिसरातील चित्रा नगरमध्ये राहणाऱ्या नाबालिक मुलीच्या अपहरण व बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी राहुल(20) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आरोपीने नाबालिकचे 11 डिसेंबरला अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. त्याच्या विरूद्ध न्यायालयात साक्ष देण्यासाठी पिडीत तिच्या आई व आजी सोबत न्यायालयात आली होती. या गुन्ह्याची ट्रायल सुरू होती.


पहिले दिली धमकी नंतर  केली मारहाण 

>> सोमवारी पिडीत, तिची आई व आजी  न्यायालयात साक्ष नोंदवण्यासाठी आल्या होत्या. अपर सत्र न्यायाधीश वर्षा शर्माच्या कोर्टात अतिरिक्त जिल्हा अभियोजन अधिकारी आरती भदौरियाने पिडीत आणि तिच्या आईची साक्ष नोंदवली. त्यानंतर पिडीत तिच्या आई व आजी सोबत बाहेर बसली होती. त्यावेळी तीन महिलांसोबत चार आरोपी तेथे आले आणि त्यांनी आमच्या विरूद्ध साक्ष देऊ नका अशी धमकी देत त्यांच्यावर हल्ला केला. 


 

लोकांना कळालेच नाही की, झाले काय आहे

>> अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लोकांना कळालेच नाही की, तेथे झाले काय आहे. त्यांची आरडाओरड एैकून सगळे लोक बाहेर आले. लोकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण त्या थांबत नव्हत्या. नंतर पोलिस येताना पाहून सगळ्यांनी पळ काढला. पिडीत आणि तिच्या आईने सांगितले की, हल्ला करणारे आरोपीच्या घरचे लोक आहेत. या मारहानीत त्या तिघिंना गंभीर मार लागला आहे. 

 

>> यानंतर न्यायालयाच्या आदेशा वरून पोलिसांनी गोलू केवट, त्याची पत्नी आणि दोन बहीनी पुजा, आरती यांच्या विरूद्ध मारहानीचा गुन्हा नोंदवला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...