आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- भारतीय महिला संघातील फलंदाज शेफाली वर्मा टी-20 आणि वन-डे फॉर्मेटमध्ये वर्ल्ड कप फायनल खेलणारी सर्वात तरुण (महिला आणि पुरुष)खेलाडू बनली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये उतरुन, तिने हे यश आपल्या नावे केलं. फायनल खेळलेल्या शेफालीचे वय 16 वर्षे 40 दिवस आहे. यापूर्वी, वेस्टइंडीजची महिला क्रिकेटर शकाना क्विनटाइनच्या नावे हा रेकॉर्ड होता. तिने 2013 मध्ये 17 वर्षे 45
दिवसांच्या वयात वन-डे वर्ल्ड कप फायनल खेळला होता.
शेफाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करू शकली नाही. ती फक्त दोन धावा काढून आउट झाली. तिला मेगन शूटने विकेटकीपर एलिसा हिलीकडे झेल दिला. त्याआधी झालेल्या सामन्यांमध्ये शेफालीने 4 सामन्यात 161 धावा काढल्या. यादरम्यान तिने दोन सामन्यांमध्ये 47 आणि 46 धावांची खेळी केले.
वर्ल्ड कपमध्ये शेफाली टी-20 रँकिंगमध्ये नंबर-1 फलंदाज बनली
या टुर्नामेंटमध्ये केलेल्या कामगिरीचा तिला टी-20 रँकिंगमध्ये फायदा मिळाला आणि ती या फॉर्मेटमध्ये जगातील नंबर-1 फलंदाज ठरली आहे. तिने सर्वात कमी, 18 सामन्यांमध्ये हे यश मिळवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.