आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी चालवण्यासाठी राज्यातील 163 महिला सज्ज, 21 आदिवासी कुटुंबातील 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य स्वाभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिला सबलीकरणाच्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजातील रूढी, परंपरा छेद देणारे खंबीर पाऊल सर्वांच्या पुढे टाकले. पुरुषी मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या अवजड वाहन चालवण्यात देशात पहिल्यांदा राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील १६३ महिलांना चालक पदावर रुजू करून घेतले असून यातील २१ महिला या आदिवासी कुटुंबांतून आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोहळ्यात महिला चालकांचे स्वागत करण्यात आले.  या वेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित होत्या. पाटील म्हणाल्या, ही अतिशय गौरवशाली ऐतहासिक बाब आहे. देशात महिला सबलीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला असून महिला सैनिक, वैमानिक, पोलिस, शास्त्रज्ञ बनल्या आहेत. रेल्वे चालवण्यात महिला पुढे आहेत.  एस.टी.ने त्यापुढेही जाऊन महिला बस चालकांची नियुक्ती केल्याने सर्व समाजाला प्रेरणा मिळणार आहे. त्यातून धैर्य, धाडस, आत्मविश्वास महिलांमध्ये जागृत होणार आहे. महिलांच्या सुरक्षा, स्वच्छतेची चांगली सोय राज्य परिवहन महामंडळाने करावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.


२१ विभागांत १४२ महिलांना संधी देणार  : रा
वते
आदिवासी महिलांचे सबलीकरण करण्यासाठी यवतमाळ विभागात २१ आदिवासी महिलांना प्रथम हलकी वाहने चालवण्याचे प्रशिक्षण देऊन सेवेत सामावून घेण्यात आले. पुढील टप्प्यात एसटीच्या २१ विभागांमध्ये हलके वाहन चालवण्याचा परवानाधारक १४२ महिलांना चालक बनण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान त्यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर एसटी स्टेअरिंग हाती देण्यात येईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.