आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखाजोखा : विधानसभेत खून, अपहरण, दरोडा, जातीय तणाव व महिलांशी संबंधित गुन्हेगारांचा भरणा; २००९ पेक्षा २०१४ मध्ये वाढले गुन्ह्यांचे प्रमाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मावळत्या विधानसभेतील २८८ पैकी १६५ म्हणजेच ५७% आमदारांवर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, धार्मिक तणाव आणि महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. पैकी ११५ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. ५१ आमदारांवर गुन्हे निश्चितही झाले आहेत. सर्वाधिक गुन्हे असणारे आमदार शिवसेना-भाजप युतीचेच आहेत. २००९ च्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या तुलनेत युती सरकारमध्ये गुन्हेगारी प्रकरणे दाखल असलेल्या आमदारांची संख्या २९ ने वाढली आहे.

शिवसेना आणि भाजपने २०१४ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. मात्र पार्टी विथ डिफरन्स म्हणत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने निकालानंतर शिवसेनेशी हातमिळवणी केली. भाजपचे १२२, शिवसेना ६३, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ तर काँग्रेसचे ४२ आमदार निवडून आले.  मात्र, यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात अालेल्या शपथपत्राच्या विश्लेषणातून ही बाब स्पष्ट झाली.
 

९ आमदारांवर दाखल आहेत अपहरणाचे गुन्हे; यात ३ भाजपचे, ५ राष्ट्रवादीचे, तर १ शिवसेना आमदार  
> 115 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
> 51 प्रकरणात आमदारांवर गुन्हे निश्चितीकरण
> 03 आमदारांवर खुनाचे गुन्हे आहेत. यात दोन भाजपचे तर सेनेचा एक आमदार आहे.
> 03 आमदारांवर जातीय तणाव पसरवण्याचे गुन्हे
> 15 आमदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे
भाजप ५, शिवसेना ७, राष्ट्रवादी २, अपक्ष १
> 11 आमदारांवर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल
भाजप 5 | शिवसेना 6
पैकी ८ आमदारांवर महिलेवर हल्ला, विनयभंगाचा गुन्हा
> 14 आमदारांवर दरोडा आणि लुटीचे गुन्हे 
भाजप 5 | शिवसेना 6
राष्ट्रवादी 2 | माकप 1